IPL 2023: 31 मार्चपासून सुरु होणाऱ्या IPL 2023आधी ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी सलामीवीर अॅरॉन फिंचने लखनऊ सुपर जायंट्स संघाबाबत (LSG) मोठी भविष्यवाणी केली आहे.
केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखालील लखनऊचा संघ या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, असा दावा त्याने केला आहे.
फिंचने यामागे संघाची कमजोर गोलंदाजी हे मोठे कारण सांगितले आहे. लखनऊच्या गोलंदाजीत फारशी ताकद नाही, त्यामुळे या संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे त्याचे मत आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज फिंच स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान म्हणाला की, “लखनऊच्या गोलंदाजीत फारशी ताकद नाही. मात्र, त्यांच्याकडे मिडिल ओवर्ससाठी खूप चांगले पर्याय आहेत, अनेक महान अष्टपैलू खेळाडू देखील आहेत, परंतु जेव्हा डेथ ओव्हर्सचा विचार केला जातो, तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.''
लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या संघाने केएल राहुलच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली.
संघाने 14 पैकी 9 सामने जिंकले आणि क्रमांक-3 वर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला, परंतु एलिमिनेटरमध्ये आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला.
यावेळी, लखनऊने लिलावादरम्यान डॅनियल सायम्स आणि रोमॅरियो शेफर्ड यांसारख्या परदेशी अष्टपैलू खेळाडूंवर विश्वास दाखवला, तर अनुभवी अमित मिश्राही संघात सामील झाला आहे.
आयपीएल 2023 पूर्वी या संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या मोसमात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा देशांतर्गत डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहे.
याशिवाय, या संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून येते. त्याचवेळी, क्विंटन डी कॉक सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, मार्क वुड, रवी बिश्नोई, आवेश खान आणि जयदेव उनाडकट.
लोकेश राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, क्रुणाल पांड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई, निकोल्स पूरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, डॅनियल सायम्स, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर चरक.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.