IPL 2022: राजस्थान रॉयल्सच्या अनुभवी खेळाडूने गमवली टीम इंडियात परतण्याची संधी

इयान बिशपने केला दावा
Sanju Samson|IPL 2022
Sanju Samson|IPL 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप याला वाटते की, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये प्रभावी खेळी न खेळल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघात पुनरागमनासाठी मजबूत दावा करण्याची संधी गमावत आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाला अजूनही भारतीय टी-20 संघात आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. आयपीएलमधील चांगली कामगिरी त्याला T20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी मजबूत दावा करण्यास मदत करू शकते.

"जेव्हा जोस बटलर मोठी धावसंख्या करू शकत नाही, तेव्हा संजूकडे धावा करण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये परतण्याचा जोरदार दावा करण्याची चांगली संधी आहे, परंतु तो या संधी वाया घालवत आहे," अस मत बिशपने व्यक्त केले आहे. तो फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

Sanju Samson|IPL 2022
चेन्नईविरुद्ध सामना जिंकल्याचे श्रेय या दोन गोलंदाजांचे : कर्णधार मयांक अग्रवाल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या मागील सामन्यात बटलर लवकर बाद झाला आणि सॅमसनला संधी होती. पण 27 धावा केल्यानंतर त्याने श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाला रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट बहाल केली. बिशप म्हणाले, "संजू फॉर्ममध्ये नाही असे नाही. पण तो सहज विकेट गमावत आहे. मी संजू सॅमसनचा चाहता आहे, परंतु तो शॉटच्या निवडीमुळे त्याचा चांगला फॉर्म खराब करत आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीला वाटते की सॅमसनसाठी फलंदाजी करणे सोपे आहे आणि अशा परिस्थितीत तो अनेक गोष्टी आजमावण्याचा प्रयत्न करतो. व्हिटोरी म्हणाला की, ‘त्याच्यासाठी हा खेळ खूपच सोपा आहे असे दिसते आणि त्यामुळे तो काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com