युजवेंद्र चहलच्या हॅट्ट्रिकवर धनश्रीची प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल

धनश्रीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे
IPL 2022 | Dhanashree Verma  Reaction |Uzvendra Chahal
IPL 2022 | Dhanashree Verma Reaction |Uzvendra Chahal Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 30 व्या सामन्यात युजवेंद्र चहल दिसला. राजस्थान रॉयल्सच्या या फिरकी गोलंदाजाने संस्मरणीय कामगिरी करताना हॅटट्रिकसह 5 बळी घेतले. चहलेच्या या कामगिरीमुळे राजस्थानने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील चौथा विजय मिळवल्यानंतर संजू सॅमसनचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (ipl 2022 dhanashree verma reaction after yuzvendra chahal)

मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही चहलची पत्नी धनश्री वर्मा राजस्थानला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. चहलने पॅट कमिन्सला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केल्याने धनश्रीला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत आणि तिने आनंदाने स्टँडवर उडी घेतली. धनश्रीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

IPL 2022 | Dhanashree Verma  Reaction |Uzvendra Chahal
सुरेश रैना नाही तर 'हा' खेळाडू आहे मिस्टर आयपीएल

17 व्या षटकात हॅटट्रिक

चहलने डावाच्या 17 व्या षटकात ऐतिहासिक हॅटट्रिक घेतली. त्या षटकात चहलने एकूण चार खेळाडूंना बाद करण्यात यश मिळवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चहलने श्रेयस अय्यरला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चहलने शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केले. यानंतर पॅट कमिन्सला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने हॅटट्रिकच्या चेंडूवर झेलबाद केले.

युजवेंद्र चहलने चार षटकांत 40 धावा देत पाच बळी घेतले. चहलची आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले पाच बळी ठरले. तसेच, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी हॅट्ट्रिक घेणारा चहल हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अजित चंडिला, शेन वॉटसन, श्रेयस गोपाळ आणि प्रवीण तांबे यांना ही कामगिरी केली आहे.

धनश्री सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे

युजवेंद्र चहल आणि धनश्रीने डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. धनश्री एक उत्तम कोरिओग्राफर आहे आणि तिचे डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होतात. धनश्रीचे स्वतःचे एक YouTube चॅनल देखील आहे, ज्याचे सुमारे 26 लाख सदस्य आहेत. धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com