आयपीएल 2022 ने 14 वर्षांचा विक्रम मोडला, आकडेवारी घ्या जाणून

अशा स्थितीत गुजरात प्लेऑफपूर्वी तयारी करण्याच्या प्रयत्नात
ipl 2022 14 year record broken most sixes hit this season know the stats
ipl 2022 14 year record broken most sixes hit this season know the statsDanik Gomantak

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 चा 62 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात खास नव्हती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 9 चेंडूत 5 धावा काढून डेव्हॉन कॉनवे बाद झाला. यानंतर मोईन अलीने सहाव्या षटकात राशिद खानला 2 षटकार ठोकले. यासह हा मोसम मोठा विक्रमी ठरला. (ipl 2022 14 year record broken most sixes hit this season know the stats)

अलीने रशीदच्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन षटकार ठोकले. यासह आयपीएलमध्ये एक खास विक्रम झाला आहे. IPL 2022 मध्ये 873 षटकार मारले गेले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये 734, IPL 2019 मध्ये 784, IPL 2018 मध्ये 872 आणि IPL 2012 मध्ये 731 षटकार मारले गेले होते.

ipl 2022 14 year record broken most sixes hit this season know the stats
भारतीय महिलांच्या लैंगिक जीवनावर सरकारी अहवालात धक्कादायक खुलासे

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक षटकार

आयपीएल 2022 - 873 षटकार (चेन्नईच्या डावात तीन षटकारांपर्यंत)

आयपीएल 2018- 872 षटकार

आयपीएल 2019- 784 षटकार

आयपीएल 2020- 734 षटकार

आयपीएल 2012- 731 षटकार

गुजरात टायटन्सने याआधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय चेन्नईचा संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत गुजरात प्लेऑफपूर्वी तयारी करण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय चेन्नईलाही युवा खेळाडूंना आजमावण्याची संधी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर धोनी म्हणाला की, आम्ही आमच्या संघात चार बदल केले आहेत. उथप्पा रायुडू, ब्राव्हो, टीक्षाना यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी जग्गी, सोलंकी, सँटनेर, मथिशा खेळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com