IPL 2021: 16 वर्षांखालील क्रिकेट चाहत्यांना मैदानात सामना पाहण्यास परवानगी नाही

16 वर्षांखालील चाहत्यांना शारजाह स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी नाही.
Rohit Sharma
Rohit Sharma Twitter/ @ani_digital
Published on
Updated on

IPL 2021, Phase 2: आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होणार आहे. यूएईमध्ये आयपीएलचा हंगाम पुन्हा एकदा रंगणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे देशात सामने रोख लागल्यानंतर सामने होणार की, नाही अशी चिंता क्रिकेट चाहत्यांना सतावत होती. मात्र अखेर आयपीएलचा हंगाम पुन्हा एकदा सुरु होणार या आनंदाच्या बातमी क्रिकेटप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. बीसीआयने यासंबंधीची मोठी घोषणा केली आहे. याआगोदर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता स्टेडियममध्ये चाहत्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.

आता मात्र पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना स्टेडियमध्ये उपस्थित राहून आयपीएलच्या सामन्यांचा घेता येणार आहे. त्याचबरोबर आपल्या आवडत्या खेळाडू आणि टीमला प्रोत्साहीतही करता येणार आहे. बीसीसीआयने यासंबंधीची अधिकृत माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. आयपीएल सामन्याचं तिकीट www.iplt20.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

Rohit Sharma
IPLमध्ये चमक दाखविणाऱ्या खेळाडूला अजूनही मिळू शकते T20 World Cupचे तिकीट

शिवाय, मैदानावर सामना पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यासंबंधीची खबरदारीही घ्यावी लागणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सिजनमधील सामने दुबई, शारजाह, आणि अबुधाबी या शहंरामध्ये खेळविण्यात येणार आहेत. आयपीएलचा पहिला हंगाम भारतात खेळविण्यात आला होता. त्यावेळी 29 सामन्यानंत आयपीएलमच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा अर्धवटच सोडावी लागली होती. आता उर्वरित राहिलेले सामने यूएईमध्ये होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या दुसऱ्या पर्वातील पहिला सामना रंगणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com