IPL 2021: MSD च्या 'फिनीशींग सिक्सने' CSK इन तर SRH आउट

चेन्नईने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. यासह, या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा CSK हा पहिला संघ बनला आहे. (IPL 2021)
IPL 2021: CSK beat SRH by 6 Wickets MSD finish in his style CSK qualify for the playoff
IPL 2021: CSK beat SRH by 6 Wickets MSD finish in his style CSK qualify for the playoff Dainik Gomantak

IPL 2021 आता अंतिम टप्प्यात आले आहे. हळूहळू प्लेऑफचे (Playoff) चित्रही स्पष्ट होत आहे. 44 सामन्यांनंतर एका संघाने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे, तर एक संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुरुवारी शारजामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हे घडले आहे . या सामन्यात CSK आणि SRH चे संघ आमनेसामने होते. चेन्नईने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. यासह, या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा CSK हा पहिला संघ बनला आहे. परंतु हैदराबादचे स्वप्न भंगले आहे. SRH ने गेल्या वर्षी प्लेऑफ खेळला होता आणि गेली काही वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करत होता पण यावेळी हा संघ अपयशी ठरला आहे.(IPL 2021: CSK beat SRH by 6 Wickets MSD finish in his style CSK qualify for the playoff)

IPL 2021: CSK beat SRH by 6 Wickets MSD finish in his style CSK qualify for the playoff
IPL 2021: CSK beat SRH by 6 Wickets MSD finish in his style CSK qualify for the playoff Twitter @IPL

एमएस धोनीच्या (MS Dhoni) संघाने गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफचे तिकीट कमावले . त्याचबरोबर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला हैदराबाद स्पर्धेचा पहिला संघ ठरला आहे.

काल झालेल्या सामन्यात ओपनिंग बॅट्समन हे दोन्ही संघांमधील सर्वात मोठा फरक जाणवला हैदराबादची सलामीची जोडी केवळ 3.3 षटकांपर्यंत टिकली, पण त्यातही केवळ 23 धावा झाल्या. जेसन रॉय फक्त 2 धावा करून परतला. त्या तुलनेत चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने पुन्हा एकदा मागील अनेक सामन्यांप्रमाणे धमाकेदार भागीदारी केली. या दोघांनी 10.1 षटकांत 75 धावा जोडल्या, ज्यामुळे विजय जवळपास निश्चित झाला.

IPL 2021: CSK beat SRH by 6 Wickets MSD finish in his style CSK qualify for the playoff
IPL 2021: RCB कडून RR चे 'रॉयल एन्काऊंटर'

पण मात्र त्यांनंतरही CSK अडचणीतच आलस्यासारखे जाणवत होते.कारण ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर मोईन अली मैदानात आला. संघाला अशी आशा होती की तो सामना जिंकूनच परत येईल पण राशिद खानने त्याला स्वस्तात परत पाठवले. अलीने 17 चेंडूत 17 धावा केल्या. यानंतर होल्डरने सुरेश रैनाला एलबीडब्ल्यू केले आणि चेन्नईला दडपणाखाली आणले. रैनाला फक्त दोन धावा करता आल्या. त्याच षटकात होल्डरने डु प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवून चेन्नईच्या अडचणीत भर घातली. डु प्लेसिसने 36 चेंडूत 41 धावा केल्या. आणि या ननंतरच CSK च्या अडचणी वाढताना दिसल्या.

संघ अडचणीत होता पण अंबाती रायडू आणि कर्णधार एमएस धोनी शेवटपर्यंत उभे राहिले आणि त्यातच MSD ने आपल्या स्टाईलने कालचा सामना संपवला धोनीने षटकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. रायडू 17 धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या डावात 13 चेंडू खेळले आणि एक चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याचवेळी धोनीने 11 चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 14 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com