India vs Australia Women T20 : भारताच्या महिला क्रिकेट संघाने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने रोमांचक विजय नोंदवला. सुपर ओव्हरमध्ये भारताने 1 आऊट 20 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 16 धावा करू शकला. भारताने दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांनी भारताकडून चमकदार कामगिरी केली. यात स्मृती मानधना हीने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. आणि ऋचानेही षटकारही मारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 1 गडी गमावून 16 धावाच करू शकला. भारताकडून रेणुका सिंगने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. तिने 16 धावांत एक विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 1 आऊट 188 धावा केल्या होत्या. त्यांच्या बेथ मुनी आणि ताहिला मॅकग्रा यांनी तुफानी खेळी केली. ताहिलाने 51 चेंडूत 70 धावा केल्या. त्यात 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. मुनीने 54 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. तिने 13 चौकार मारले. हिली 25 धावा करून माघारी परतली. भारताकडून दीप्ती शर्माने एकमेव विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टीम इंडियासाठी सलामीला आल्या. शेफालीने 23 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकारासह 34 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज 4 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 21 धावांचे योगदान दिले. स्मृती मानधनाने 49 चेंडूत 79 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. तर 13 चेंडूंचा सामना करताना ऋचाने 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. भारताने 5 विकेट गमावून 187 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.