India Women Hockey Team
India Women Hockey TeamDainik Gomantak

Indian Women Hockey संघाचा दक्षिण आफ्रिकेवर मात, सलग तीन विजयांसह सेमीफायनलमध्ये एन्ट्री

नेशन कप 2022 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला.
Published on

FIH Women's Nations Cup 2022:भारतीय महिला हॉकी संघाने त्यांची विजयी लय कायम राखली आहे. महिला नेशन्स कप 2022 स्पर्धेत भारतीय संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिका संघाला 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.

यासह भारताने ग्रुप बी मध्ये सलग तीन विजय आणि 9 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता भारताचा उपांत्य फेरीत आर्यंलडविरुद्ध सामना होणार आहे. भारताकडून दिप ग्रेस एक्का (14') आणि गुरजीत कौरने (59') प्रत्येकी एक गोल केला. दक्षिण आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही.

India Women Hockey Team
Indian Women Hockey संघाचा जपानला पराभवाचा धक्का, ग्रुपमध्येही गाठले अव्वल स्थान

भारतीय संघाने मागील काही सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही आक्रमक सुरुवात केली. त्यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये चेंडूवर सर्वाधिक ताबाही ठेवला होता. त्यामुळे पहिल्याच क्वार्टरमध्ये एक्काने 14 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला आणि भारताचे खाते उघडले.

त्यानंतरही भारताने ही लय कामय राखली. त्यांनी दुसऱ्या क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सर्कलमध्ये अनेकदा प्रवेश केला होता. पण गोलरक्षक ऍनेल वॅन डेवेन्टरने चांगला बचाव केला, त्यामुळे भारतीय खेळाडूंना आघाडी घेण्यात अपयश आले.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने चेंडूवर ताबा ठेवला होता. पण या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पण शेवटच्या क्वार्टरच्या अखेरीस गुरजीत कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला पुनरागमन करण्याची संधी नव्हती. त्यामुळे भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताचा पुढील सामना 16 डिसेंबर रोजी आयर्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.15 वाजता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com