CWG 2022: भारत रचणार इतिहास, यजमान इंग्लंडची होणार बत्ती गुल?

Indian Women Team: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा पहिला सेमीफायनल आज भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये रंगणार आहे.
Indian Women Team
Indian Women Team Dainik Gomantak

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा पहिला सेमीफायनल आज भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये रंगणार आहे. अ गटातील तीनपैकी दोन सामने जिंकून भारताने बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडला पराभूत करुन इतिहास रचण्याचे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. आज भारत जिंकण्यात यशस्वी ठरला तर रौप्य पदक निश्चित होईल. या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, बार्बाडोसविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. तानिया भाटियाच्या जागी यष्टिका भाटियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले, तर अष्टपैलू पूजा वस्त्राकरनला सभिनेनी मेघनाच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. पूजा ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तानविरुद्धचे (Pakistan) सुरुवातीचे सामने खेळू शकली नाही. विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पूजाची खूप उणीव भासली होती.

Indian Women Team
CWG 2022: पुरुष हॉकीमध्ये भारताची कॅनडावर 8-0ने मात

दुसरीकडे, भारताने बार्बाडोसवर 100 धावांनी दणदणीत विजय नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हन खूप मजबूत दिसत होती. रेणुका सिंगने गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. रेणुका या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 9 बळी घेणारी गोलंदाज बनली आहे.

Indian Women Team
CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाचा बार्बाडोसवर दणदणीत विजय; उपांत्य फेरीत प्रवेश

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (क), तानिया भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com