Indian Super League: कोल्हापूरचा अनिकेत जाधव हैदराबाद संघात

Indian Super League: मागील दोन मोसम जमशेदपूर एफसीकडून खेळल्यानंतर अनिकेत आगामी मोसमात हैदराबादच्या जर्सीत दिसेल
Indian Super League: Aniket Jadhav
Indian Super League: Aniket JadhavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कोल्हापूर (Kolhapur) येथील 21 वर्षीय आक्रमक फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याच्याशी हैदराबाद एफसीने (Hyderabad FC) तीन वर्षांचा करार केला आहे. इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील मागील दोन मोसम जमशेदपूर एफसीकडून (Jamshedpur FC) खेळल्यानंतर अनिकेत आगामी मोसमात हैदराबादच्या जर्सीत दिसेल. भारतात 2017 साली झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत तो यजमान संघातून खेळला होता. नव्या करारानुसार तो हैदराबाद एफसी संघात 2023-24 मोसमअखेरपर्यंत असेल. आयएसएल स्पर्धेतील काही चांगले खेळाडू हैदराबाद एफसीकडून खेळत आहेत. त्यामुळे सर्वोत्तम ठरण्यासाठी आम्हा खेळाडूंत चांगलीच स्पर्धा असेल, असे अनिकेतने करारपत्रावर सही केल्यानंतर नमूद केले. आक्रमक शैलीच्या अनिकेतचे प्रशिक्षक मानोलो मार्किझ यांनी हैदराबाद संघात स्वागत केले आहे.

Indian Super League: Aniket Jadhav
Goa Football: गोव्याचे तेजस देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी

कोल्हापूर येथे जन्मलेल्या अनिकेतच्या कारकिर्दीची सुरवात पुणे एफसी अकादमीतर्फे झाली. तेथे तो तीन वर्षे होता. 2015 मध्ये 17 वर्षांखालील विश्वकरंडक संघ शिबिर प्रक्रियेत तो निवडला गेला. चमकदार कामगिरीसह तो भारतातच झालेल्या 16 वर्षांखालील एएफसी कप व 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत खेळला. 2019 मध्ये अनिकेतने इंग्लंडमधील ब्लॅकबर्न रोव्हर्स अकादमीत तीन महिन्यांचे प्रशिक्षण शिबिर पूर्ण केले होते.

अनिकेतची व्यावसायिक कारकीर्द

- आय-लीग स्पर्धा : इंडियन अॅरोज (2017-2019) – 18 सामने, 2 गोल

- आयएसएल स्पर्धा : जमशेदपूर एफसी (2019 -2021) – 27 सामने, 2 गोल

Indian Super League: Aniket Jadhav
Sports: गोव्याची महिला फुटबॉलपटू मिशेलला एएफसी स्पर्धेची संधी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com