Indian Super League: ‘सुपर सब’ ईशान पंडिताने केला निर्णायक गोल 

बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियवर पिछाडीनंतर नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 3-2 असे निसटते हरविले.
Jamshedpur FC

Jamshedpur FC

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: भरपाई वेळेतील नाट्यात ‘सुपर सब’ ईशान पंडिता याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात जमशेदपूर एफसीने निसटत्या विजयासह तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. त्यांनी गुरुवारी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियवर पिछाडीनंतर नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 3-2 असे निसटते हरविले.

सामन्याच्या 84व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरलेल्या ईशान पंडिताने 90+3व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. गतमोसमात एफसी गोवातर्फे पंडिता हमखास गोल करणारा ‘सुपर सब’ ठरला होता. यंदा त्याने जमशेदपूरतर्फे पहिला गोल करताना उपयुक्तता सिद्ध केली. त्यापूर्वी पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने जमशेदपूरला 44व्या मिनिटास बरोबरी साधून दिली होती, तर मोसमातील पहिला गोल करताना बोरिस सिंगने त्यांना 56व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली.

<div class="paragraphs"><p>Jamshedpur FC</p></div>
Indian Super league: ‘सुपर सब’ सिव्हेरियोमुळे हैदराबाद अव्वल

जमैकाचा देशॉर्न ब्राऊन याने नॉर्थईस्ट युनायटेडतर्फे खिंड लढविली, पण ती पुरेशी ठरली नाही. मुंबई सिटीविरुद्ध हॅटट्रिक केलेल्या ब्राऊनने सामन्याच्या चौथ्याच मिनिटास नॉर्थईस्टला सनसनाटी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर 90+1व्या मिनिटास ब्राऊनने आणखी एक गोल करून गुवाहाटीच्या संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली होती, पण पंडिताच्या गोलमुळे सामन्याचा निकाल बदलला. ब्राऊनने आता स्पर्धेत सहा गोल केले आहेत.

जमशेदपूरचा हा 10 लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता 16 गुण झाले असून हैदराबाद एफसी व मुंबई सिटी यांना गुणतक्त्यात गाठले आहे. मात्र गोलसरासरीत मागे राहिल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडला 10 लढतीत सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आठ गुण आणि दहावा क्रमांक कायम राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com