दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून सुरु होणार्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी BCCI ने रविवारी ( India vs South Africa, T20I) भारतीय संघाची घोषणा केली. टी-20 मालिकेव्यतिरिक्त इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी केएल राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 9 जून रोजी दिल्लीत (Delhi) पहिला टी-20 सामना, दुसरा 12 जून रोजी कटकमध्ये, तिसरा सामना 14 जून रोजी विशाखापट्टणममध्ये, चौथा 17 जून रोजी राजकोटमध्ये आणि पाचवा आणि अंतिम टी-20 सामना बेंगळुरुमध्ये खेळायचा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
शिवाय, दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी संघ निवडण्यासोबतच निवडकर्त्यांनी इंग्लंड (England) दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच ही कसोटी खेळवली जाणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. दोन्ही संघांमधील हा कसोटी सामना 1 ते 5 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.