महेंद्रसिंग धोनीने खरेदी केली विंटेज लँड रोव्हर 3

भारतीय संघाचा अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) कार आणि बाईकवर विशेष प्रेम आहे
Land Rover series 3
Land Rover series 3Twitter
Published on
Updated on

भारतीय संघाचा अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) कार आणि बाईकवर विशेष प्रेम आहे आणि त्याला त्याची आवडही आहे. त्याच्या कार आणि बाईक कलेक्शनमध्ये विविध प्रकारच्या चारचाकी गाड्या आणि मोटार बाईक आहेत. धोनीने अलीकडेच आणखी एक विंटेज (Land Rover series 3) गाडी खरेदी केली आहे. धोनीने त्याच्या '1971 लँड रोव्हर सीरीज III स्टेशन वॅगन' या कलेक्शनमध्ये एक विंटेज कार अॅड झाली आहे. बिग बॉय टॉईजने आयोजित केलेल्या विंटेज आणि क्लासिक कारच्या ऑनलाइन लिलावात धोनीने ही कार खरेदी केली आहे.

माहीने लँड रोव्हर किती किंमतीला विकत घेतले हे सांगण्यास ई-ऑक्शन कंपनीने नकार दिला. ऑनलाइन लिलाव 19 डिसेंबर रोजी सुरू झाला आणि महिनाभर चाललेला ई-लिलाव 8 जानेवारी 2022 रोजी संपला. या ई-लिलावात देशभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. बिग बॉय टॉईज कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 19 विशेष कारची यादी लिलावासाठी ठेवली होती, ज्यात रोल्स रॉयस, कॅडिलॅक, ब्यूक, शेवरलेट, लँड रोव्हर, ऑस्टिन, मर्सिडीज-बेंझ आणि इतर गाड्यांचा समावेश होता. या गाड्या देशभरातील प्रसिद्ध कलेक्शनपैकी होत्या आणि गुडगावच्या प्रमुख शोरूममध्ये प्रदर्शनासाठी ठेवल्या जात होत्या.

व्हिंटेज फॉक्सवॅगन बीटल 1960 चा लिलाव 1 रुपयांपासून सुरू झाला आणि 25 लाख रुपयांपर्यंत गेला आणि एका तरुण टेक उद्योजकाने जिंकला होता. लिलावात नवीन ग्राहकांचा सहभाग दिसला ज्यांना व्हिंटेज कार कुठून खरेदी करायची हे माहित नव्हते.

Land Rover series 3
कार विमा होणार महाग, वाचा सविस्तर

या लिलावात काही सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. महेंद्रसिंग धोनीने लिलावात भाग घेतला आणि स्वतःसाठी लँड रोव्हर 3 खरेदी केली. लँड रोव्हर 3 चा समृद्ध वारसा पाहता एक विशेष स्थान मिळणे अपेक्षित होते. 1970 च्या दशकात आणि 1980 च्या मध्यापर्यंत ही कार सुरुवातीला 2.25-लिटर इंजिनसह मार्केटमध्ये आणली होती. या कारला चार-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बॉक्ससह ऑफर केले गेले होते. मात्र, धोनीच्या गॅरेजमध्ये येणार्‍या मॉडेलचे अचूक वैशिष्ट्य सध्या सांगता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com