Tokyo Paralympicमध्ये भारताने उभारली 7 पदकांची हंडी

भालाफेकमध्ये (Javelin throw) देवेंद्र झाझरिया (Devendra Jhazaria) यांनी रौप्यपदकावर नाव कोरले आहे. तर सुंदरसिंग गुर्जरने (Sundar Singh Gurjar) कांस्य मिळविले आहे.
टोकियोमधून (Tokyo Paralympic) भारतासाठी (India) आजची सकाळी ही आनंदाची अशीच आहे.
टोकियोमधून (Tokyo Paralympic) भारतासाठी (India) आजची सकाळी ही आनंदाची अशीच आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

टोकियोमधून (Tokyo Paralympic) भारतासाठी (India) आजची सकाळी ही आनंदाची अशीच आहे. 19 वर्षीय अवनी लेखराला (Avani Lekhara) नेमबाजीत (Shooting) सुवर्ण (Gold) मिळाले. तर योगेशने जिंकले रौप्य पदक मिळविले आहे. भारताच्या अवनी लेखारा हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये सुवर्णपदक (Gold medal) जिंकले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या (Air rifle) वर्ग 1 मध्ये प्रथम स्थान मिळवले. या धाडसी खेळाडूने 249.6 गुण मिळवले आणि अव्वल राहिले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताला नेमबाजीत सुवर्णपदक मिळाले आहे.

तर दुसरीकडे, योगेश कठुनिया यांनी पहाटे भारतासाठी दुसरी आनंदाची बातमी आणली आहे. त्याने भारतासाठी थाळी फेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने फायनलमध्ये 56 मिटर थाळीफेक प्रकारात दुसरे स्थान मिळवले. त्याच्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने 44.38 मीटर, हंगामातील सर्वोत्तम थाळीफेकत, पदक पटकाविले.

भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरिया यांनी रौप्यपदकावर नाव कोरले आहे. तर सुंदरसिंग गुर्जरने कांस्य मिळविले आहे. देवेंद्र झाझरिया आणि सुंदरसिंग गुर्जर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, भालाफेक एफ 46 श्रेणीमध्ये चांगली कामगिरी करत भारताला आणखी दोन पदके मिळवून दिली. देवेंद्र झाझरिया यांनी रौप्य आणि सुंदर सिंहने कांस्यपदक पटकावले आहे. आता भारताकडे 7 पदके आहेत. देवेंद्र झाझारियाचे पॅरालिम्पिकमधील हे तिसरे पदक आहे. यापूर्वी त्याने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com