VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या वुमेन्स आशिया कप 2026च्या फायनल सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा उडवत चषक आपल्या नावावर केला.
Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
Mohsin Naqvi Dainik Gomantak
Published on
Updated on

Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या वुमेन्स आशिया कप 2026च्या फायनल सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा उडवत चषक आपल्या नावावर केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये स्मृती मानधनाने 59 तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 68 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 111 धावांत ऑलआऊट झाला.

भारताकडून (India) श्री चरणीने 4 तर दीप्ती शर्माने 3 बळी घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. या मोठ्या विजयासह भारताने पुन्हा एकदा आशिया खंडातील आपले वर्चस्व सिद्ध केले. या ऐतिहासिक विजयापेक्षाही जास्त चर्चा सध्या प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान झालेल्या मोठ्या हायव्होल्टेज ड्रामाची होत आहे. 2025च्या मेन्स आशिया कपमधील विजयानंतर भारतीय पुरुष संघाने एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तानचे कॅबिनेट मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता.

Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
Team India Players Retirement: रोहित शर्मा, मोहम्मद शमी... युवा खेळाडूंची एन्ट्री, दिग्गजांची एक्झिट! 2026 मध्ये टीम इंडियाचे 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती?

त्यानंतर नक्वी ती ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले होते, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर 'ट्रॉफी चोर' म्हणून ट्रोल केले गेले होते. यावेळेसही बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते की, भारतविरोधी वक्तव्ये आणि भूमिका घेणाऱ्या व्यक्तीकडून भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही.

Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
Team India: व्हीव्हीएस लक्ष्मण हेड कोच, श्रेयस अय्यर कर्णधार; एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा नवा मास्टरप्लॅन!

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी संघाच्या या निर्णयाचे पूर्ण समर्थन केले असून, हेड कोच अमोल मुजुमदार यांनीही संघ चॅम्पियन आहे आणि ट्रॉफी मिळाली काय किंवा नाही मिळाली काय, त्याने आमचे विजेतेपद बदलत नाही, अशी आक्रमक भूमिका मांडली. फायनल सामन्यानंतर मोहसिन नक्वी व्यासपीठावर ट्रॉफी देण्यासाठी 45 मिनिटे वाट पाहत उभे राहिले, परंतु भारतीय महिला संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. अखेर अपमानित होऊन नक्वींना रिकाम्या हाताने स्टेडियम सोडावे लागले.

Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
Team India: टीम इंडियात सर्व काही आलबेल नाही? गौतम गंभीर-अजीत अगरकर यांच्यात मतभेद? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांनी नक्वींना पाहताच 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा आणि घोषणाबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि मोहसिन नक्वी यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड नाचक्की ओढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Harmanpreet Kaur Record
IND vs PAK Women's T20 Asia Cup
India vs Pakistan women’s Asia cup 2026
Women's Asia Cup 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com