Women Asia Cup 2022: भारतीय महिला संघाने सातव्यांदा पटकावले Asia Cup चे विजेतेपद

Women Asia Cup 2022: भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पराभव करत सातव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले.
Women Team
Women TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Women Asia Cup 2022: भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पराभव करत सातव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवत सर्वांची मने जिंकली.

श्रीलंकेने 66 धावांचे लक्ष्य ठेवले होते

भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) डाव 20 षटकांत 9 बाद 65 धावांवर रोखला. तर टीम इंडियाने (Team India) 66 धावांचे लक्ष्य अगदी सहजरित्या गाठले. स्मृती मंधानाने भारतासाठी (India) शानदार प्रदर्शन केले.

Women Team
Women's Asia Cup 2022: 18 वर्षीय शेफाली वर्माची बांगलादेशविरुद्ध चमकदार कामगिरी

गोलंदाजांनी चमत्कार केला

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात शनिवारी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला, जो भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे चुकीचा ठरला. भारताकडून रेणुका सिंगने तीन तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. श्रीलंकेकडून कोणत्याही महिला खेळाडूला शानदार कामगिरी करता आली नाही.

भारतीय संघात एक बदल

अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. तर भारतीय संघात राधा यादवच्या जागी दयालन हेमलताचे पुनरागमन झाले आहे.

Women Team
Women's Asia Cup 2022: महिला आशिया चषकाला 1 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत.

श्रीलंका- चमारी अटापट्टू, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी, निलाक्षी डिसिल्वा, कविशा दिलहरी, मलशा स्नेहानी, ओशादी रणसिंघे, सुगंधा कुमारी, इनोका रणवीरा, अचीनी कुलसूर्य.

Women Team
Women’s T20 Asia Cup चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला भिडणार IND vs PAK

भारत: हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com