FC Goa: एफसी गोवाचे आक्रमण आणखी धारदार; उदांता सिंगसोबत दीर्घकालीन करार

मणिपूरचा उदांता सिंग हा भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूही आहे.
FC Goa signs Udanta Singh
FC Goa signs Udanta SinghDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa signs Udanta Singh: फुटबॉलपटू उदांता सिंग आता एफसी गोवाचे आक्रमण धारदार करण्यासाठी सज्ज झाला आहे. गतिमान खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या या २७ वर्षीय विंगर खेळाडूशी आयएसएल स्पर्धेतील संघाने दीर्घकालीन करार केला.

मणिपूरचा उदांता हा भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूही आहे. त्याच्या समावेशाने या संघात अनुभव आणि गतिशीलता येण्याचे संकेत आहेत. मध्यरक्षक रॉलिन बोर्जिस याच्यानंतर एफसी गोवाने आगामी फुटबॉल मोसमासाठी करारबद्ध केलेला उदांता हा दुसरा अनुभवी फुटबॉलपटू आहे.

"एफसी गोवा संघात दाखल होताना मी अत्यंत उत्साही असून अभिमानही वाटत आहे. एफसी गोवाच्या शैलीचा मी चाहता आहे," असे उदांता याने करारपत्रावर सही केल्यानंतर नमूद केले. "एकत्र काम करण्यासाठी आमच्यात एका वर्षाहून अधिक काळ परस्पर हितसंबंध आहेत, आता करार प्रत्यक्षात आल्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे देण्यासारखे खूप काही आहे. भरपूर करंडक जिंकण्याची माझी स्वप्ने असून आता त्याची सुरवात होईल," असे उदांता भावी वाटचालीविषयी म्हणाला.

"उदांताचा भन्नाट वेग, चेंडूसह थेट धाव, खेळाडूंना गुंगारा देण्याचे कौशल्य प्रशंसनीय आहे. या गुणवैशिष्टांना गतवर्षी आम्ही मुकलो. त्याच्या संघातील आगमनामुळे आम्हाला कमजोरीवर मात करण्याची संधी लाभत आहे. आम्हाला लीगमधील भरपूर अनुभव आणि विजयी आलेख असलेला खेळाडू लाभत आहे," असे उदांताचे संघात स्वागत करताना एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सांगितले.

FC Goa signs Udanta Singh
हैदराबादच्या 27 वर्षीय महिलेची लंडनमध्ये चाकूने भोसकून हत्या; आरोपी ब्राझीलचा रहिवाशी

दीर्घानुभवी फुटबॉलपटू

जमशेदपूर येथील टाटा फुटबॉल अकादमीत फुटबॉलचे शास्त्रोक्त धडे घेतल्यानंतर बंगळूर एफसीतर्फे उदांताच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीस सुरवात झाली. आय-लीग स्पर्धेनंतर २०१७-१८ पासून तो सलगपणे आयएसएल स्पर्धेत बंगळूर एफसी संघाकडून खेळला.

आय-लीग, आयएसएल, ड्युरँड कप, सुपर कप व फेडरेशन कप स्पर्धा मिळून तो बंगळूरतर्फे दोनशेहून जास्त सामने खेळला असून एएफसी कप स्पर्धेतील २६ सामन्यांचा अनुभवही त्याच्या गाठीशी आहे. बंगळूर संघासाठी त्याने २२ गोल करताना २२ असिस्टचीही नोंद केली आहे, तसेच विविध स्पर्धाही जिंकल्या.

भारताकडून त्याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, आतापर्यंत तो ३६ आंतरराष्ट्रीय लढती खेळला आहे. २०१८ साली इंटरकाँटिनेंटल कप, २०२१ साली सॅफ कप जिंकलेल्या आणि २०१९ साली आशियाई करंडक स्पर्धेत खेळलेल्या भारतीय फुटबॉल संघात उदांताचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com