Rahul Dravid reaction as his stats were shown on television screen
Rahul Dravid reaction as his stats were shown on television screen Dainik Gomantak

Rahul Dravid Video: स्क्रिनवर दिसताच द्रविडचा फुलला चेहरा, पाहा नक्की काय झालं होतं

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान एका गोष्टीमुळे द्रविडच्या चेहऱ्यावर दिसलेल्या हास्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

India vs Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आला. याच सामन्यादरम्यान एका गोष्टीमुळे राहुल द्रविडच्या चेहऱ्यावर दिसलेल्या आनंदाने चाहत्यांचे लक्ष वेधले.

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याचा 50 वा वाढदिवस बुधवारी साजरा केला. त्याच्या वाढदिवशी तो भारतीय संघासह होता. दरम्यान, दुसरा वनडे सामना सुरु असताना एका क्षणी समालोचक द्रविडबद्दल चर्चा करत होते. त्याने खेळलेल्या एकमेव टी20 सामन्याबद्दल समालोचकांमध्ये चर्चा सुरू होती.

त्यावेळी कॅमेरा द्रविडकडे नेण्यात आला आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीही दाखवण्यात आली. यावेळी द्रविड स्वत:लाच पाहून हसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या या हस्याने अनेक चाहत्यांनाही प्रफुल्लित केले. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Rahul Dravid reaction as his stats were shown on television screen)

Rahul Dravid reaction as his stats were shown on television screen
Rahul Dravid: 'द वॉल'चा साधेपणा पुन्हा समोर! पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितला मन जिंकणारा किस्सा

द्रविडने त्याच्या कारकिर्दीत एकच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. त्याने 2011 सालच्या इंग्लंड दौऱ्यात हा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल होती. या टी20 सामन्यात त्याने 31 धावा करताना तीन षटकारही खेचले होते.

दरम्यान, द्रविडने त्याच्या वनडे कारकिर्दीत 344 सामने खेळताना 39.16 च्या सरासरीने 10889 धावाही केल्या. यामध्ये त्याच्या 12 शतकांचा आणि 83 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 36 शतकांचा आणि 63 अर्धशतकांचा सामावेश आहे.

Rahul Dravid reaction as his stats were shown on television screen
Rahul Dravid: वर्षाला 10 कोटी मोबदला घेणाऱ्या राहुल द्रविडचे प्रशिक्षकपद धोक्यात?

दरम्यान, द्रविड वनडे आणि कसोटी या दोन्ही प्रकारात प्रत्येकी 10 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या 7 खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याव्यतिरिक्त अशी कामगिरी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा, ब्रायन लारा आणि माहेला जयवर्धने यांनी केली आहे.

द्रविडच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये दोन वेळा त्रिशतकी भागीदारी करण्याचाही विक्रम आहे. त्याने सौरव गांगुलीबरोबर 1999 साली श्रीलंकेविरुद्ध 318 धावांची भागीदारी केली होती. तसेच त्याने सचिन तेंडुलकरबरोबर देखील 1999 सालीच 331 धावांची भागीदारी केली होती.

द्रविडने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com