HBD Venkatesh Prasad: 1996 चा वर्ल्डकप, पाकिस्तान अन् वेंकटेश प्रसादनं घेतलेली 'ती' ऐतिहासिक विकेट, पाहा Video

Venkatesh Prasad Video: वर्ल्डकप 1996 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात वेंकटेश प्रसादने घेतलेली अमीर सोहेलची विकेट क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली होती.
Venkatesh Prasad
Venkatesh PrasadDainik Gomantak
Published on
Updated on

Venkatesh Prasad dismissal of Aamir Sohail in 1996 Cricket World Cup:

भारत आणि पाकिस्तान संघातील सामने नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामनेही रोमांचक होतात. दरम्यान, या दोन संघातील असा एक सामना आहे, जो क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत राहिलेला आहे.

हा सामना म्हणजे 1996 साली वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेला सामना. हा सामना सर्वाधिक चर्चेत राहिला तो वेंकटेश प्रसादने अमीर सोहेलच्या घेतलेल्या विकेटमुळे.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघ 9 मार्च 1996 रोजी आमने - सामने होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 288 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून कर्णधार अमील सोहेल आणि सईद अन्वर यांनी तडाखेबंद फलंदाजी करत सुरुवात केली. या दोघांनीही 10 षटकांमध्येच 80 धावांचा टप्पा पार केला होता. अखेर सईद अन्वरला (48) जवागल श्रीनाथने अनिल कुंबळेच्या हातून झेलबाद केले.

Venkatesh Prasad
Venkatesh Prasad: 'तो टॉप 10 ओपनर्समध्येही...': KL राहुल पुन्हा प्रसादच्या निशाण्यावर

अन्वर बाद झाल्यानंतरही सोहेल त्याच्याच लयीत फलंदाजी करत होता. याचदरम्यान 15 व्या षटकात सोहेल आणि वेंकटेश प्रसाद यांच्यात चकमक घडली. या षटकात प्रसादने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर सोहेलने पुढे येत कव्हर्सला चौकार ठोकला.

इतकेच नाही, तर त्याने पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी चाललेल्या प्रसादकडे पाहून 'पुढच्या चेंडूवर पण चौकार मारणार' अशा अर्थाचे हातवारे केले. हे पाहून मात्र प्रसादचाही पारा चढला. पण त्याने शब्दाने वार केले नाहीत, तर त्याने पुढच्याच चेंडूवर सोहेलला क्लीन बोल्ड केले.

त्यानंतर मात्र भारताने जोरदार जल्लोष केला. त्या एका विकेटने प्रसाद मात्र रातोरात स्टार झाला. ही विकेट आजही आयकॉनिक विकेट्सपैकी एक समजली जाते. भारत-पाकिस्तान सामन्यांवेळी नेहमीच या विकेटची आठवण काढली जाते. सोहेल 46 चेंडूत 55 धावांवर बाद झाला होता.

दरम्यान, मैदानात चकमक घडली असली, तरी मैदानाबाहेर सोहेल आणि प्रसाद चांगले मित्र आहेत.

Venkatesh Prasad
Venkatesh Prasad: 'पैसा आणि ताकद असूनही...', टीम इंडियावर वेंकटेश प्रसादची सडकून टीका

सोहेल बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ 49 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला आणि भारतीय संघाने 39 धावांनी हा सामना जिंकला. भारताकडून प्रसाद आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच जवागल श्रीनाथ आणि वेंकटपथी राजू यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून नवज्योत सिंग सिद्धूने 93 धावांची खेळी केली होती. तसेच अजय जडेजाने 45 धावांची, तर सचिन तेंडुलकरने 31 धावांची खेळी केलेली. याशिवाय कोणालाही 30 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. त्यामुळे भारताने 50 षटकात 8 बाद 287 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानकडून वकार युनूस आणि मुश्ताक अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर अकिब जावेद, अता-उर-रेहमान आणि अमीर सोहेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतलेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com