

India vs Pakistan, Hong Kong Sixes: क्रिकेटप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील हाय-व्होल्टेज सामना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांचा उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचतो, त्यामुळे या ऐतिहासिक सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा लागल्या आहेत.
हाँगकाँगच्या मोंग कोक येथील मिशन रोड ग्राऊंडवर हा थरारक सामना खेळवला जाईल. क्रिकेटच्या नेहमीच्या फॉरमॅटपेक्षा हाँगकाँग सिक्सेसचा फॉरमॅट पूर्णपणे वेगळा आणि अतिशय वेगवान असतो. या स्पर्धेत 11 ऐवजी केवळ 7 खेळाडूंचा संघ असतो आणि प्रत्येक डाव 6-6 षटकांचा असतो. कमी षटकांचा खेळ असल्यामुळे सुरुवातीपासूनच चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळते.
भारतीय वेळेनुसार हा महामुकाबला शुक्रवारी सकाळी 11:45 वाजता सुरु होईल, तर सकाळी 11:15 वाजता टॉस होईल. या स्पर्धेत भारतीय संघाचे (Team India) नेतृत्व अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या करत आहे, तर पाकिस्तानची कमान मोहम्मद अब्बास आफ्रिदीच्या हातात आहे. भारतीय संघात राहुल त्रिपाठी, शशांक सिंह, नितीश राणा, कुलवंत खेजरोलिया, राहुल तेवतिया आणि टी नटराजन या खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर उपलब्ध असणार नाही. मात्र, डिजिटल माध्यमांवर प्रेक्षक या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. भारतीय चाहते हाँगकाँग सिक्सेसमधील भारत-पाकिस्तान सामना 'फॅनकोड' ॲप आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर थेट पाहू शकतात, ज्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.