Virat Kohli: 'सितारा...!', किंगकडून प्रिन्सचं विशेष कौतुक! Gillच्या शतकावर विराटची लक्षवेधक कमेंट

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतक केल्यानंतर विराट कोहलीने त्याचे खास शब्दात कौतुक केले आहे.
Shubman Gill | Virat Kohli
Shubman Gill | Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

India vs New Zealand 3rd T20I: भारताने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 168 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी20 मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. या विजयात शुभमन गिलने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या शतकाचे विराट कोहलीनेही कौतुक केले आहे.

भारतीय संघाचा प्रिन्स म्हणून ओळख मिळवलेल्या शुभमन गिलने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून 63 चेंडूत 126 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले. हे गिलचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले.

त्याने केलेल्या शतकाबद्दल भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीला त्याचा गिलबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर लिहिले आहे की 'सितारा. तू भविष्य आहेस.' विराटच्या या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Shubman Gill | Virat Kohli
Shubman Gill: शतक एक, रेकॉर्ड्स अनेक! टीम इंडियाचा 'प्रिन्स' आता विराट-रोहितच्या पंक्तीत

गिल सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षात एकाच महिन्याच्या आत एका द्विशतकासह एकूण 4 शतके केली आहेत. त्यामुळे त्याला भारतीय संघाचा उगवता सिताराही अनेकांनी म्हटले आहे.

गिलने मोडला विराटचा विक्रम

गिलने नाबाद 126 धावांची खेळी केल्याने तो आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने गेल्यावर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यात नाबाद 122 धावांची खेळी केली होती.

Shubman Gill | Virat Kohli
Shubman Gill: नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'शतकवीर' गिलचा थरार; चौकार-षटकारांची आतिषबाजी, पाहा Video

भारताने जिंकली मालिका

शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या टी20 सामन्यात 20 षटकात 4 बाद 234 धावांचा डोंगर उभारलेला. भारताकडून गिलव्यतिरिक्त राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 44 धावांची आणि हार्दिक पंड्याने 17 चेंडूत 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

त्यानंतर 235 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी 12.1 षटकात केवळ 66 धावांवरच रोखले. भारताकडून हार्दिक पंड्याने 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतने हा सामना सहज जिंकला.

या विजयासह भारताने मालिकेवरही कब्जा केला. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com