IND vs AUS: आले अन् गेले...! टीम इंडिया 109 धावांवर ऑल आऊट होताच भन्नाट Memes Viral

इंदूर कसोटीत भारतीय संघ 109 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
India vs Australia | 3rd test
India vs Australia | 3rd test Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia 3rd Test Viral Memes: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी (1 मार्च) सुरू झाला. मात्र, सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाची फलंदाजी कोलमडली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या समोर संघर्ष करताना दिसली. भारताचा पहिला डाव 33.2 षटकातच 109 धावांत संपुष्टात आला.

India vs Australia | 3rd test
IND vs AUS, 3rd Test: केएल राहुल, शमीला वगळले! 'या' खेळाडूंना मिळाली टीम इंडियाच्या Playing XI मध्ये संधी

भारताच्या सर्व विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी घेतल्या. मॅथ्यू कुहनेमनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 3 विकेट्स आणि टॉड मर्फीने 1 विकेट घेतली.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 21 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याच फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. विशेष म्हणजे भारताने पहिल्या तासातच 5 विकेट्स गमावल्या होत्या.

त्यामुळे सोशल मीडियावर युजर्सने अनेक गमतीशीर मीम्स शेअर केल्या आहेत. तसेच हे मीम्स शेअर करताना काही चाहत्यांनी याचीही आठवण करून दिली की भारतीय संघाकडेही रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल हे तीन फिरकी गोलंदाज आहेत. त्याबरोबरच काहींनी या सामन्यासाठी संधी न मिळालेल्या केएल राहुलबद्दल देखील मीम्स शेअर केल्या आहेत.

केएल राहुल खराब फॉर्मचा सामना करत असल्याने त्याच्या ऐवजी गिलला या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

(Memes Viral after Team India all out for 109 runs in 1st Inning of Indore Test)

India vs Australia | 3rd test
IND vs AUS: इंदूरच्या स्टेडियमवर होणार द्विशतक! आतापर्यंतचे आकडे कसे आहेत ते जाणून घ्या

दरम्यान, भारतात झालेल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची ही चौथ्या क्रमांकाची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी 2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ 76 धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2017 साली पुण्यात झालेल्या कसोटीत भारतीय संघ 105 आणि 107 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com