सिडनी : हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या संयमी खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. अश्विन 130 आणि हनुमा विहारी 160 चेंडू खेळल्यामुळे भारताने या सामन्यातील पराभवाची नामुष्की ठाळली. हनुमा विहारीला दुखापत झाली, तरीदेखील तो खेळपट्टीवर टिकून राहिला. अश्विन व हनुमा विहारी यांनी सहाव्या विकेटसाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आलेल्या ४०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच विकेट्सच्या मोबदल्यात ३३४ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी मालिकेच्या सिडनीतील तिसऱ्या सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला. ऋषभ पंतने दमदार खेळी करत भारताच्या विजयाची शक्याता कायम ठेवली. कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराबरोबर फलंदाजी करताना चांगली सुरूवात करून दिली. रहाणे लवकर माघारी परतला, परंतु पंतने चांगली खेळी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा केल्या. त्याच्या शतकाला अवघ्या तीन धावांनी हुलकावणी दिली. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अत्यंत शांतपणे टिकून असलेला पुजारादेखील २०५ चेंडूत ७७ धावा करून त्रिफळाचीत झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.