India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना या शुक्रवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधीच टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंग पावू शकते. पहिला टी-20 सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दुसरा टी-20 सामना भारतासाठी 'करा किंवा मरो' असा असणार आहे.
दुसऱ्या T20 च्या आधी टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आली
दुसरा T20 सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात (Nagpur) होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात संततधार पाऊस सुरु आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी या परिस्थितीबद्दल नाराज आहेत. कारण सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाने अडथळा आणला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) टी-20 मालिका जिंकणे भारताला (India) शक्य होणार नाही. अशा स्थितीत हैदराबादमध्ये होणारा तिसरा टी-20 सामना जिंकून भारताला मालिका 1-1 अशी बरोबरीत ठेवण्याची केवळ संधी असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगू शकते
45,000 क्षमतेच्या नागपूर स्टेडियमवरील सामन्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. यातच सामना पुढे न गेल्यास पैसे परत करावे लागतील. बुधवारी दुपारी दोन्ही संघ ऑरेंज सिटीत दाखल झाले, मात्र सायंकाळनंतरही अधूनमधून संततधार सुरुच होती. आज सकाळी 10 च्या सुमारास पाऊस थांबला असला तरी, पाऊस कधीही येवू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.