Asian Cup 2023: भारतीय फुटबॉल संघाची झुंज अपयशी, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात विजय

India Football Team: एशियन कप 2023 स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
India vs Australia Football | AFC Asian Cup 2023
India vs Australia Football | AFC Asian Cup 2023AFP
Published on
Updated on

India suffers a 2-0 loss against Australia in AFC Asian Cup 2023:

शनिवारी (13 जानेवारी) एएफसी आशियाई कप 2024 स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघाविरुद्ध झाला. दोहामधील अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळानंतर ऑस्ट्रेलियाने 2-0 असा विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली होती. भारताने आक्रमक सुरुवातही केली होती. लल्लियांझुआला छांगटेने सुरुवातीला आक्रमण केले होते. पण ऑस्ट्रेलियानेही कडवी झुंज दिली. नंतर ऑस्ट्रेलियानेही भारताच्या सर्कलमध्ये प्रवेश करत भारतीय बचावाला आव्हान दिले.

India vs Australia Football | AFC Asian Cup 2023
Hockey Olympic Qualifiers: मिशन पॅरिस ऑलिम्पिक! भारतीय महिला संघ रांचीत खेळणार क्विलिफायर, पाहा वेळापत्रक

दरम्यान, पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलिया आक्रमक होते, मात्र भारताच्या बचावाने त्यांचे आव्हान परतून लावताना एकही गोल होऊ दिला नाही. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून गोल झाला नाही.

मात्र, दुसऱ्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाने लय मिळवली. 50 व्या मिनिटाला भारताचा गोलकिपर गुरप्रीत बॉल आडवण्यासाठी आलेला असताना त्याच्याकडून चुकून इर्विन जॅक्सनकडे पास गेला, ज्याचा फायदा त्याने घेत ऑस्ट्रेलियासाठी पहिला गोल नोंदवला.

India vs Australia Football | AFC Asian Cup 2023
AFC Asian Cup: भारतीय संघ पाचव्यांदा खेळणार स्पर्धा! कसे आहे सुनील छेत्रीच्या टीम इंडियाचे वेळापत्रक

त्यानंतर 73 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाकडून बॉस जॉर्डनने दुसरा गोल केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अखेरच्या काही मिनिटांचा खेळ राहिलेला असताना महत्त्वपूर्ण 2-0 अशी आघाडी मिळवली. ही आघाडी टिकवून ठेवण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. त्यामुळे अखेरीस भारताला हा सामना 2-0 अशा फरकाने पराभूत व्हावा लागला.

दरम्यान, भारतीय संघ पाचव्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. भारताला आत्तापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा या स्पर्धेचे 18 वे पर्व खेळले जात आहे. आता या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना 18 जानेवारीला उझबेकिस्तानविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com