Ind Vs Pak: भारताचे चार गडी तंबूत; पंड्या जडेजा भारताला विजय मिळवून देणार का?

IND vs PAK
IND vs PAKDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया कपमधील भारत-पाकिस्तानमधील सामना चांगलाच रंगात आला आहे. पाकिस्तानाने भारतासमोर 148 धावांचे आव्हान उभे केले आहे. भारतीय संघाची मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना दमछाक होताना दिसत आहे. भारताचे सलामीवीर राहुल, रोहित, कोहली आणि सूर्यकुमार यादव चारहीजण तंबूत परतले आहेत. सध्या मैदानावर हार्दीक पंड्या आणि रविंद्र जडेजा भारताची बाजू संभाळत आहेत.

भारतीय संघ तीन बाद 100 धावांवर पोहचला आहे. हार्दीक पंड्या (08) आणि रविंद्र जडेजा (21) धावांवर खेळत आहेत. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 35 धावा केल्या मात्र कर्णधआर रोहित शर्मा, के. एल राहुल हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव फंलदाजी करत असताना तो 18 धावांवर त्रिफळाचित झाला.

भारतीय संघाची भिस्त सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रविंद्र जडेजा आणि हार्दीक पंड्या यांच्यावर आहे. दरम्यान, दिनेश कार्तिक देखील अजून फलंदाजीसाठी मैदानात उतरायचा बाकी आहे.

दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींची नजर या सामन्याकडे लागून राहिली आहे. तेव्हा या सामन्यात काय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

IND vs PAK
Goa Congress: प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर दिल्लीला रवाना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com