Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Suryakumar Sanju Samson video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ३१ जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
Suryakumar Yadav Sanju Samson video
Suryakumar Yadav Sanju Samson video Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ३१ जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. भारताने आधीच ही मालिका जिंकत वर्चस्व सिद्ध केले असून, अंतिम सामना केवळ औपचारिकतेचा ठरणार आहे. तरीही भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, सामन्यापूर्वी भारतीय संघाचे विमानतळावरून बाहेर पडतानाचे काही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांच्यातील हलकीफुलकी गंमत पाहायला मिळते.

व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव गर्दीतून संजू सॅमसनला वाट करून देताना “हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा” असे म्हणताना दिसतो. त्यानंतर सूर्यकुमारने संजूला “फिलिंग ग्रेट?” असे विचारले असता, संजूने हसत “फिलिंग ऑल्वेज ग्रेट” असे उत्तर दिले.

दोघांमधील हा संवाद चाहत्यांना विशेष भावला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून युवा खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे संघाची ताकद अधिक वाढली आहे.

Suryakumar Yadav Sanju Samson video
Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत भारताने मालिकेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारतीय संघाकडून आक्रमक खेळाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com