IND vs AUS, 1st ODI: शमीने अर्धा ऑस्ट्रेलियन संघ धाडला माघारी, भारतासमोर विजयासाठी 277 धावांचे आव्हान

India vs Australia: पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 277 धावांचे आव्हान ठेवले आहे.
India vs Australia
India vs AustraliaDainik Gomantak

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली असून पहिला सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 277 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 276 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

India vs Australia
IND vs AUS: केएल राहुलने जिंकला टॉस! अश्विन, स्मिथ, कमिन्ससह दिग्गजाचे कमबॅक, पाहा 'प्लेइंग-11'

ऑस्ट्रेलियाकडून सलामीला मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन खेळाडू उतरले होते. पण पहिल्याच षटकात मार्शला मोहम्मद शमीने 4 धावांवर बाद केले. पण नंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली.

या दोघांनीही ऑस्ट्रेलियाला भक्कम सुरुवात दिली होती. याच भागीदारीदरम्यान वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. पण, तो अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने शुभमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. वॉर्नरने 53 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.

त्यानंतर स्मिथने शेन लॅब्युशेनला साथीला घेत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण स्थिरावलेल्या स्मिथला शमी 22 व्या षटकात त्रिफळाचीत केल. स्मिथने 60 चेंडूत 41 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज छोटीखानी खेळी करत बाद होत गेले.

India vs Australia
IND vs AUS ODI: वर्ल्डकपआधी कांगारुंशी दोन हात करणार टीम इंडिया, पाहा पूर्ण वेळापत्रक

स्मिथ बाद झाल्यानंतर लॅब्युशेन आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यातील भागीदारी रंगत होती. पण ही भागीदारी जास्त धोकादायक ठरण्यापूर्वीच आर अश्विनने लॅब्युशेनला ३९ धावांवर बाद केले.

पण त्यानंतर अचानक पाऊस आल्याने काहीवेळासाठी सामना थांबला होता. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंग्लिस दुहेरी धाव घेत असताना गोंधळ झाला आणि ग्रीन ३१ धावांवर धावबाद झाला. त्याला ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव यांनी धावबाद केले.

मात्र, यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि जोश इंग्लिस यांच्यात 62 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 240 धावांचा टप्पा सहज ओलांडला. अखेर ही भागीदारी शमीनेच तोडली. त्याने स्टॉयनिसला 29 धावांवर त्रिफळाचीत केले.

त्यानंतर लगेचच इंग्लिसला बुमराहने 45 धावांवर बाद केले. 49 व्या षटकात शमीने मॅथ्यू शॉर्ट आणि सीन ऍबॉट यांना बाद केले. याबरोबर त्याने 5 विकेट्स पूर्ण केल्या. डावाच्या अखेरच्या चेंडूवर ऍडम झम्पा धावबाद झाला.

भारताकडून शमीव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com