SA vs IND, ODI: अर्शदीप-आवेशने द. आफ्रिकेच्या फलंदाजांना नाचवलं! भारतासमोर विजयासाठी 117 धावांचे लक्ष्य

South Africa vs India, 1st ODI: पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर अवघ्या 117 धावांचेच लक्ष्य ठेवता आले आहे.
Team India
Team IndiaBCCI
Published on
Updated on

South Africa vs India, 1st ODI at Johannesburg:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात रविवारपासून (17 डिसेंबर) 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली असून पहिला सामना जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 117 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.3 षटकात 116 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेतल्या, तर आवेश खानने 4 विकेट्स घेतल्या. तसेच एक विकेट कुलदीप यादवने घेतली.

Team India
SA vs IND: चालू द. आफ्रिका दौऱ्यादरम्यान टीम इंडियात पाच बदल! 'हे' गोलंदाज बाहेर, तर कोचही बदलले

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने रिझा हेड्रिक्स आणि रस्सी वॅन डर ड्युसेन यांच्या लागोपाठच्या चेंडूवर विकेट्स घेतल्या.

त्यानंतर कर्णधार एडेन मार्करम आणि टोनी डी झोर्झी यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. पण आठव्या षटकात अर्शदीपनेच झोर्झीला 28 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर 10 व्या षटकात अर्शदीपनेच धोकादायक हेन्रिक क्लासेनलाही 6 धावांवर त्रिफळाचीत केले.

Team India
SA vs IND: टी20 मालिका संपली, आता सुरु होणार वनडे मालिकेचा थरार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

11 व्या षटकात आवेश खानने दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्के दिले. त्याने मार्करमला 12 धावांवर आणि विआन मुल्डरला शुन्यावर बाद केले. डेव्हिड मिलरचाही (2) अडथळा त्यानेच दूर केला. अँडिल फेहलुक्वायो आणि केशव महाराजने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण आवेशनेच महाराजला 17 व्या षटकात 4 धावांवर बाद केले.

पण त्यानंतरही फेहलुक्वायोने डाव पुढेला होता. मात्र, त्याचा अडथळा अर्शदीपने त्याला 33 पायचीत करत दूर केला. याबरोबरच अर्शदीपने 5 विकेट्सही पूर्ण केल्या. अखेरची विकेट नांद्रे बर्गरच्या रुपात पडली. त्याला कुलदीप यादवने त्रिफळाचीत केले. ताब्राईज शम्सी 11 धावांवर नाबाद राहिला.

या डावात डीआरएस रिव्ह्युचे पायचीतचे निर्णय भारताच्या बाजूने लागल्यानंही दक्षिण आफ्रिकेला कमी धावसंख्येवर रोखण्यासाठी भारतीय संघाला फायदा झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com