Womens Blind Cricket Team: भारताच्या पहिल्या महिला अंध क्रिकेट संघाची घोषणा, प्रशिक्षक आणि कर्णधार मध्य प्रदेशातून!

Cricket News: भारताच्या पहिल्या महिला अंध क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ नेपाळविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत देशाचे प्रतिनिधित्व करेल.
Women's Cricket Team
Women's Cricket TeamTwitter / @blind_cricket
Published on
Updated on

Cricket News: भारताच्या पहिल्या महिला अंध क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ नेपाळविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत देशाचे प्रतिनिधित्व करेल. विशेष म्हणजे, संघाची कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही मध्य प्रदेशातील आहेत.

संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार मध्य प्रदेशचे आहेत

भारताची (India) पहिली महिला अंध क्रिकेट कर्णधार सुषमा पटेल मध्य प्रदेशातील दमोह येथील रहिवासी आहे, तिला तिच्या कामगिरीच्या जोरावर संघाची कर्णधार बनवण्यात आली आहे.

तर मध्य प्रदेशची कृतिका चार्वे भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाणार आहे. मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील प्रिया कीर देखील या संघाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत संघातील प्रशिक्षकासह दोन खेळाडू मध्य प्रदेशातील आहेत.

Women's Cricket Team
Team India: ठरलं तर! टी20 मालिकेसाठी ऑगस्टमध्ये भारतीय संघ करणार 'या' देशाचा दौरा

ही मालिका नेपाळमध्ये होणार आहे

दरम्यान, हा संघ 25 ते 30 एप्रिल दरम्यान नेपाळविरुद्ध (Nepal) पाच टी-20 सामने खेळणार आहे. मध्य प्रदेशच्या सुषमा पटेलला कर्णधार आणि कर्नाटकच्या गंगाव्वा नीलप्पा हरिजनला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

सीएबीआय निवड समितीचे अध्यक्ष आणि असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया क्रिकेटचे सरचिटणीस ई जॉन डेव्हिड यांनी सांगितले की, निवड चाचणी दरम्यान खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतरच नियुक्त्या आणि संघाची निवड करण्यात आली आहे.

तसेच, भारतीय संघाची तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये B-1, B-2 आणि B-3 ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत फक्त हेच खेळाडू सहभागी होतील. त्यासाठी संघाची तयारीही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हा भारताचा पहिला महिला अंध क्रिकेट संघ असेल.

Women's Cricket Team
Team India: रोहित ब्रिगेडसाठी श्रीलंका ठरणार खलनायक, ICC ट्रॉफी जिंकू देणार नाही!

भारतीय संघ खालीलप्रमाणे आहे

B1 श्रेणी- सुषमा पटेल (कर्णधार), के संध्या, वर्षा, पद्मिनी तुडू, सीमा दास, प्रिया, व्ही.रावानी.

B2 श्रेणी- गंगव्वा नीलप्पा हरिजन (उपकर्णधार), सँड्रा डेव्हिस, बसंती हंसदा, प्रीती बेन, प्रीती प्रसाद.

B3 श्रेणी- फुला सरेन, गंगा कदम, दीपिका टीसी, झिली बिरुआ, एम सत्यवती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com