ICC ODI Ranking: इशान-गिलची गरुडझेप, वनडे क्रमवारीत मिळवले सर्वोत्तम रेटिंग पाँइंट्स

आयसीसीने बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली असून इशान आणि गिल यांनी मोठी झेप घेतली आहे.
Shubman Gill & Ishan Kishan
Shubman Gill & Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI Cricket Ranking:

आशिया चषक २०२३ स्पर्धा सध्या सुरू आहे. याचदरम्यान आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत काही भारतीय खेळाडूंनीही प्रगती केली आहे.

भारतीय संघाने आशिया चषकात नुकताच पाकिस्तानविरुद्ध आणि नेपाळविरुद्ध सामने खेळले. यातील पाकिस्तानविरुद्धचा सामना एक डाव पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे रद्द झाला होता. तसेच नेपाळविरुद्धही पावसाचा व्यत्यय आलेला, पण हा सामना भारताने १० विकेट्सने जिंकला.

यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारताचे शुभमन गिल आणि इशान किशन यांनी फलंदाजांच्या यादीत प्रगती केली आहे. गिलने नेपाळविरुद्ध नाबाद ६७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ७५० रेटिंग गुण मिळवले आहेत. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर आला.

Shubman Gill & Ishan Kishan
भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचाही World Cup 2023 साठी संघ घोषित, 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी

इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची खेळी केली होती. त्यानेही कारकिर्दीतील सर्वोत्तम ६२४ रेटिंग पाँइंट्स मिळवले आहेत. तो १२ स्थानांची गरुडझेप घेत २४ व्या क्रमांकावर आला आहे.

फलंदाजी क्रमवारीत बाबर आझम अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्याने आशिया चषकात नेपाळविरुद्ध १५१ धावांची खेळी करत हा अव्वल क्रमांक भक्कम केला आहे. त्याचे ८८२ रेटिंग पाँइंट्स आहेत. दक्षिण आफ्रिकेचा रस्सी वॅन दर द्युसेन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, गिलव्यतिरिक्त पहिल्या १० फलंजादाजांमध्ये विराट कोहली आहे. तो १० व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा ११ व्या क्रमांकावर आहे.

Shubman Gill & Ishan Kishan
Asia Cup 2023: रोमांचक विजयासह श्रीलंकेची सुपर-4 मध्ये धडक, अफगाणिस्तान आशियामधून कप बाहेर!

गोलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यात मिळून ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच हॅरिस रौफ १४ स्थानांनी पुढे जात २९ व्या क्रमांकावर, तर नसीम शाह १३ स्थानांनी पुढे जात ६८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन १० व्या क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेचा महिश तिक्षणाचीही प्रगती झाली असून तो १५ व्या क्रमांकावर आहे. दरम्यान गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकावर जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क आहेत.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे, हा क्रिकेटपटू म्हणजे हार्दिक पंड्या. त्याने पाकिस्तानविरुद्ध ८७ धावांची खेळी केली होती. तो १० व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर शाकिब अल हलन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com