हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा

हरभजन सिंगने (Harbhajan Singh) 1998 मध्ये पदार्पण केले आणि आता 23 वर्षांनी त्याने क्रिकेटला कायमचा अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Harbhajan Singh


Harbhajan Singh

Dainik Gomantak

Published on
Updated on

भारताचा महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजन सिंगने 1998 मध्ये पदार्पण केले आणि आता 23 वर्षांनी त्याने क्रिकेटला कायमचा अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंगने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली आणि आज तो 41 वर्षांचा आहे.

हरभजन सिंगने (Harbhajan Singh) 1998 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (australia) कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध त्याने वनडेमध्ये पदार्पण केले. 2006 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (south africa) टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

<div class="paragraphs"><p><br>Harbhajan Singh</p></div>
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया मांगे मोर!

हरभजन सिंगची चमकदार कारकीर्द

तेव्हापासून 2015 सालापर्यंत त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 बळी घेतले, तर दोन शतकांसह 2235 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 236 सामन्यांमध्ये 269 विकेट घेतल्या आणि 1237 धावा केल्या. T20 बद्दल बोलायचे झाले तर येथे त्याच्या नावावर 28 सामन्यात 25 विकेट आहेत. T20 मध्ये पदार्पण केले. हरभजन सिंग हा अनिल कुंबळे आणि आर अश्विन नंतर भारतासाठी तिसरा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे. हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे ज्यामध्ये त्याने एकूण 150 विकेट घेतल्या आहेत.

राजकारणात जाण्याची चर्चा

अलीकडेच पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी हरभजन सिंगची भेट घेतली. तेव्हापासून हरभजन सिंग लवकरच राजकारणात येऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यानंतर या दिग्गज खेळाडूने या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. तसेच नवज्योतसिंग सिद्धू यांची एक क्रिकेटपटू म्हणून भेट झाल्याचे म्हटले. त्याचवेळी, मागील काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की, पंजाबचा हा स्टार निवृत्तीनंतर आयपीएल संघाचा सपोर्ट स्टाफ म्हणून सहभागी होऊ शकतो. मात्र त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com