India All Rounder Hardik Pandya said his workload is double or triple than Batter or bowler:
भारतीय संघ सध्या आशिया चषक 2023 स्पर्धा खेळत आहे. तसेच यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची भूमिका महत्त्वाची राहाणार आहे.
हार्दिक गेल्या एक-दीड वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. 2018 आशिया चषकानंतर तो सातत्याने पाठीच्या दुखापतीचा सामना करत होता. त्याला त्यावर शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. पण नंतर त्याने यशस्वी पुनरागमन केले असून आता तो भारताचा वनडे क्रिकेटमध्ये उपकर्णधार आहे, तर टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार आहे.
दरम्यान, त्याच्या संघातील भूमिकेबद्दल त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले, 'एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बाकिच्यांपेक्षा माझ्यावरील वर्कलोड दुप्पट किंवा तिप्पट असतो. जेव्हा एखादा फलंदाज फलंदाजीला जातो, तेव्हा तो फलंदाजी करून त्याची कामगिरी संपवतो आणि घरी जातो. मला त्यानंतर गोलंदाजीही करायची असते.'
'त्यामुळे माझ्यासाठी सर्व गोष्टी करणे आणि सरावादरम्यान किंवा हंगामापूर्वीच्या शिबिरात होणाऱ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात.'
तसेच हार्दिक म्हणाला की तो किती षटके गोलंदाजी करणार आहे, ते सामन्याच्या परिस्थितीवर ठरते. तो म्हणाला, 'जेव्हा सामना येतो, तेव्हा संघाची काय गरज आहे त्यावर ठरते. हा खूप वास्तविक निर्णय असतो की मी किती षटके गोलंदाजी करण्याची गरज आहे.'
'कारण जर 10 षटकांची गरज नसेल, तर मी 10 षटके गोलंदाजी करण्यात काहीच अर्थ नसतो. पण जर 10 षटके पूर्ण करण्याची गरज असेल, तर मी गोलंदाजी करतो. माझा यावर नेहमीच विश्वास राहला आहे की मी माझ्या स्वत:ला यशस्वी होण्याची संधी देतो, जे मी सामना समजून घेऊन आणि माझ्या स्वत:ला पाठिंबा देऊन करतो.'
याबरोबरच त्याने असेही म्हटले आहे की स्वत:ला पाठिंबा देणे महत्त्वाचे असते. तो म्हणाला, 'मला कळाले आहे की काहीही झाले, तरी स्वत:ला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुम्ही जगात सर्वोत्तम आहात, यावर विश्वास ठेवावा लागेल. त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हास याची खात्री नाही, पण त्याचवेळी यामुळे तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी काम करण्याचा मार्ग मिळतो. त्यामुळे स्वत:ला पाठिंबा देत राहा.'
सध्या हार्दिक आशिया चषकात खेळत असून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध रद्द झालेल्या सामन्यात 87 धावांची खेळी केली होती. त्याच्याकडून आगामी काळातही भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.