IND vs ENG: द्विशतकवीर जयस्वाल बाद होताच टीम इंडियाचा डाव 400 धावांच्या आत आटोपला

India vs England: दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावल्यानंतरही भारतीय संघाला 400 धावांच्या आत रोखण्यात इंग्लंडने यश मिळवले आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalPTI
Published on
Updated on

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात विशाखपट्टण येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू आहे. या सामन्यात शनिवारी म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (3 फेब्रुवारी) भारताचा पहिला डाव 112 षटकात 396 धावांवर संपला.

या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी 94 षटकापासून आणि 6 बाद 336 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी सलामीवीर यशस्वी जयस्वालने 179 धावांपासून पुढे आणि आर अश्विनने 5 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: ...सिक्स, फोर अन् जयस्वालचं खणखणीत द्विशतक, टीममेट्सकडूनही खास कौतुक, पाहा Video

अश्विनने सुरुवातीलाच 101 व्या षटकात विकेट गमावली. पण त्यानंतर जयस्वालने दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच 102 व्या षटकात षटकार आणि चौकार ठोकत त्याचे द्विशतक पूर्ण केले. मात्र त्याच्या द्विशतकानंतर त्याला 107 व्या षटकात जेम्स अँडरसनने बाद केले.

जयस्वालने 290 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांसह 209 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लगेचच जसप्रीत बुमराहला 6 धावांवर रेहान अहमदने आणि मुकेश कुमारला शोएब बशीरने शुन्यावर बाद करत भारताचा पहिला डाव संपवला.

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: पहिल्या दिवसाच्या खेळावर जयस्वालची मोहर, डबल सेंच्युरीकडे वाटचाल; भारत 300 धावांच्या पुढे

दरम्यान, भारताच्या पहिल्या डावात पहिल्या दिवशी वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विकेट्स गमावल्या होत्या. या डावात जयस्वाल व्यतिरिक्त कोणालाही 40 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

जयस्वालनंतर भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर रजत पाटीदारने 32 धावा केल्या. तसेच रोहित शर्मा (14), श्रेयस अय्यर (27), अक्षर पटेल (27) आणि केएस भरत (17) यांनी छोटेखानी खेळी केल्या.

पहिल्या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच टॉम हर्टलीने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com