IND vs WI: हिटमॅन रचणार इतिहास, वनडेत 175 धावा करुन क्रिकेटच्या देवाला टाकणार मागे!

Rohit Sharma's ODI Record: वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसला.
Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rohit Sharma's ODI Record: वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते.

याशिवाय, त्याने 2 सामन्यांच्या तीन डावात 80 च्या सरासरीने 240 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 शतकासह दोन अर्धशतके झळकावली. आता रोहित शर्माची नजर एकदिवसीय मालिकेतील मोठ्या विक्रमावर असेल.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 10,000 धावा पूर्ण करु शकतो. हिटमॅनने आतापर्यंत 234 एकदिवसीय सामन्यांच्या 236 डावांमध्ये फलंदाजी करताना 48.63 च्या सरासरीने 9825 धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून 30 शतके आणि 48 अर्धशतके झळकली आहेत. त्यात 3 द्विशतकांचाही समावेश आहे. 10,000 चा आकडा गाठण्यासाठी त्याला 175 धावांची गरज आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 175 धावा करुन तो विशेष आकडा गाठू शकतो.

Rohit Sharma
IND vs WI: भारताने कसोटी मालिका जिंकली, पण WTC पॉइंट्सटेबलमध्ये गमवावे लागले अव्वल स्थान

सचिन तेंडुलकरला मागे टाकेल

दुसरीकडे, रोहितने एकदिवसीय सामन्यांच्या पुढील 22 डावात 175 धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा दुसरा खेळाडू बनेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) दुसऱ्या स्थानावर आहे.

अशा परिस्थितीत 22 एकदिवसीय डावात 175 धावा करुन एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 धावांचा आकडा गाठणारा हिटमॅन दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.