IND vs WI: विराटच्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचा रेकॉर्ड!

Virat Kohli: या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर करण्यात आलेला नसला तरी 26 जून रोजी बीसीसीआयकडून संघाची घोषणा केली जाणार असल्याचे मानले जात आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs WI Virat Kohli Virender Sehwag VVS Laxman: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पुढील महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, त्यातील पहिला सामना 12 जुलै रोजी होणार आहे.

भारतीय संघ 1 जुलैला वेस्ट इंडिजला पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर करण्यात आलेला नसला तरी 26 जून रोजी बीसीसीआयकडून संघाची घोषणा केली जाणार असल्याचे मानले जात आहे.

तसे पाहता यावेळी कसोटी संघातही मोठे बदल पाहायला मिळू शकतात, मात्र जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, या मालिकेत काही मोठे विक्रम कोहलीच्या निशाण्यावर असणार आहेत. विशेषत: वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे रेकॉर्ड त्याला नक्कीच मोडायला आवडेल.

Virat Kohli
WTC Final मधून वगळल्याबद्दल आर अश्विनने सोडलं मौन; म्हणाला, 'मी पण योगदान...'

विराट कोहली पुन्हा वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरणार

विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियासाठी आतापर्यंत 109 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 8409 धावा आहेत. कसोटीत त्याची सरासरी 48.72 आहे. एक काळ असा होता की, तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 50 च्या वर होती, मात्र आता काही काळापासून त्याची बॅट कसोटीत म्हणावी तशी तळपलेली नाही.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो त्याच्या आक्रमंक शैलीत दिसेल अशा अपेक्षा आहे. कोहलीच्या नावावर कसोटीत 28 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. पण वेस्ट इंडिजमध्ये कोणते दोन विक्रम त्याच्या निशाण्यावर असतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली सेहवाग आणि लक्ष्मणला मागे टाकू शकतो.

मुलतानचा सुलतान म्हणून जगभरात ओळखला जाणारा टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने 103 कसोटी सामन्यांमध्ये 8503 धावा केल्या आहेत. कसोटी धावांच्या बाबतीत विराट कोहली वीरेंद्र सेहवागपेक्षा थोडा मागे आहे. सेहवागला मागे टाकण्यासाठी कोहलीला फक्त 95 धावांची गरज आहे. होय, वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) कोहलीच्या तुलनेत कमी सामन्यांत इतक्या धावा केल्या ही दुसरी बाब आहे.

Virat Kohli
WTC 2023 Final मधील पराभवानंतर आर अश्विनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'पराभव निराशाजनक, पण...'

त्याचवेळी, निवृत्तीच्या वेळी त्याची सरासरी देखील कोहलीच्या 49.43 पेक्षा चांगली होती. प्रथम विराट सेहवागच्या मागे जाईल, त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणचा नंबर येईल, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 134 सामन्यांमध्ये 8781 धावा केल्या आहेत.

लक्ष्मणला मागे टाकण्यासाठी विराट कोहलीला 373 धावांची गरज आहे. हा आकडा मोठा वाटत असला तरी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यात विराट कोहलीच्या एकूण चार डाव असतील हे विसरता कामा नये.

या मालिकेतून विराट कोहली फॉर्ममध्ये आला, तर चार डावांत 373 धावा जास्त नाहीत. या मालिकेत हा विक्रम मोडला तर ठीक आहे, नाहीतर कोहलीला डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल जेव्हा भारतीय संघ पुन्हा कसोटी खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com