Ind Vs Wi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार आहे. हे दोन्ही सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडीज संघ आणि टीम इंडियाचे काही सदस्य फ्लोरिडाला पोहोचले आहेत. अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यानंतर इतर खेळाडूही प्लोरिडाला पोहोचतील. तिसऱ्या सामन्यानंतर खेळाडूंना त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी वेळ मिळाला आहे. कारण चौथा सामना 15 दिवसांनी खेळवला जाणार आहे.
तसेच, सामन्यांमधील अंतरामुळे भारतीय खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानापासून थोडे दूर जाण्याची संधीही मिळाली. दरम्यान, टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies) महान खेळाडू किरॉन पोलार्ड आणि त्याची पत्नी दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना हार्दिकने लिहिले की, “वेस्ट इंडिजचा कोणताही दौरा राजाच्या घरी गेल्याशिवाय अपूर्ण आहे.''
हार्दिक पांड्या यंदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये त्याने भारताला अनेक सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.