Sri Lanka Team
Sri Lanka Team Dainik Gomantak

IND vs SL: श्रीलंकेने रचला इतिहास, सलग 14 व्यांदा केली 'ही' मोठी कामगिरी

Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर-4 चा चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला जात आहे.
Published on

Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर-4 चा चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवत संघाला केवळ 213 धावांवर रोखले. यासह श्रीलंकेने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

खरे तर, श्रीलंकेने मागील सलग 14 सामन्यात विरोधी संघांना ऑलआऊट करुन इतिहास रचला आहे.

दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) भारताला 49.1 षटकात 213 धावांवर रोखले. यासह श्रीलंकेने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. वास्तविक, श्रीलंकेने वनडेमध्ये सलग 14 व्यांदा विरोधी संघाला ऑलआउट केले आहे.

भारताविरुद्ध फिरकीपटूंनी दहा बळी घेतले. तथापि, भारतासह श्रीलंकेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 वेळा विरोधी संघांना ऑलआउट केले आहे.

Sri Lanka Team
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध शार्दुल ठाकूर प्लेइंग-11 मधून बाहेर, 'या' ऑलराउंडरला मिळाली टीम इंडियात संधी

फिरकीपटू चांगल्या फॉर्ममध्ये होते

श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेलालागेने भारताविरुद्ध पाच बळी घेतले. याशिवाय, चरित असलंकाने चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. महिष तीक्षणाला एक विकेट मिळाली. दरम्यान, केवळ रोहित शर्माने (Rohit Sharma) अर्धशतकी खेळी खेळली.

Sri Lanka Team
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध फक्त 10 धावा, तरीही विराट-रोहित जोडी बनली नंबर वन; 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड नावावर

असा राहिला पहिला डाव

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने संघासाठी 53 धावांची अर्धशतकी खेळी खेळली.

याशिवाय, इशान किशनने 33 आणि केएल राहुलने 39 धावा केल्या. अक्षर 19 धावांवर तर गिलही 19 धावांवर बाद झाला. विराट 3, हार्दिक 5 आणि जडेजा 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने 49.1 षटकात 213 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com