भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) T20 मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी BCCI निवडकर्त्यांनी संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्माची कर्णधारपदी निवड झाली आहे. न्यूझीलंडसोबतच्या कसोटी मालिकेसाठी (Test series) संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. याचे कारण म्हणजे, कसोटी मालिकेत कोणाला कर्णधारपद द्यावे, हे निवडकर्त्यांनी अद्याप ठरवलेले नाही. विराट कोहली एक किंवा दोन्ही कसोटी सामन्यांमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेची या मालिकेत कर्णधारपदी निवड करायची की नवा कर्णधार रोहित शर्मा याची याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा, कोण होणार कर्णधार? अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक मालिका जिंकली, खराब कामगिरी करूनही तो प्लेइंग 11 मध्येही स्थान मिळवू शकेल का?, हा प्रश्न देखील आहेच. निवडकर्त्यांना यावर भारताचे नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत जाणून घ्यायचे आहे. राहुल द्रविडचा दृष्टिकोन निवडकर्त्यांना कर्णधार निवडण्यात मदत करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी मालिकेसाठी संघाची निवड शुक्रवारी करण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, अजिंक्य रहाणेला कर्णधार करायचे की रोहित शर्माला कर्णधारपदासाठी विचारायचे? असा प्रश्न बीसीसीआयच्या समोर आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाजी युनिट जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांना कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. यष्टिरक्षक फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतलाही मालिकेतून बाहेर ठेवले जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.