IND vs NZ 3rd T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना मालिकेतील निर्णायक ठरणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा सामना 1 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात सलामीवीर ईशान किशनला प्लेइंग 11 मधून वगळले जाऊ शकते.
या मालिकेत त्याने आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघात अशा खेळाडूचा समावेश करु शकतो, जो 18 महिन्यांनंतर भारतीय संघाचा भाग झाला आहे.
एका इंग्रजी वेबसाइटनुसार, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात ईशान किशनच्या जागी विस्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉ ला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. पृथ्वी शॉ ने अलीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु या मालिकेत त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पृथ्वी शॉ शेवटचा 2021 साली श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाकडून (Team India) खेळताना दिसला होता.
या मालिकेत ईशान किशन पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ईशानला 5 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या. लखनौच्या अटल बिहारी बाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशनने 33 चेंडूत केवळ 19 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने शेवटच्या 5 टी-20 डावात 90 च्या स्ट्राईक रेटने केवळ 63 धावा केल्या आहेत.
पृथ्वी शॉने टीम इंडियासाठी आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळताना 339 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने भारतासाठी 6 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत, ज्यात त्याने 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर पृथ्वी शॉने भारतासाठी (India) फक्त एकच टी-20 सामना खेळला आहे. या सामन्यात तो खाते न उघडताच बाद झाला होता.
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.