IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी आहे.
दरम्यान, मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीतून सावरला असून मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात संघाचा भाग होता, परंतु पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून तो बाहेर पडला होता. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळू शकला नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी एक निवेदन जारी केले की, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने अय्यरला खेळण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे तो आता दिल्लीतील कसोटी संघात सामील होईल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, " स्टार फंलदाज श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाने खेळण्यास मंजुरी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रेयस बॉर्डर- गावस्कर संघात सामील होईल.''
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.