IND vs AUS, WC 2023 Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 240 धावा केल्या.
भारताने ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे लक्ष्य दिले. यंदाच्या विश्वचषकात संपूर्ण भारतीय संघ ऑल आऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहितशिवाय विराट कोहली आणि केएल राहुलनेही चांगली फलंदाजी केली. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी एक मोठा विक्रम केला आहे.
सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा (Australia) यष्टिरक्षक जोश इंग्लिसबद्दल बोलूया. जोश इंग्लिसने सामन्यादरम्यान आपली कामगिरी चोख पार पाडली. भारतीय संघाच्या डावात त्याने पाच झेल घेतले. विश्वचषकाच्या फायनलमध्ये यष्टीरक्षकाने पाच झेल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जोश इंग्लिसने श्रेयस अय्यरचा पहिला झेल घेतला. यानंतर त्याने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर केएल राहुलचा झेल घेतला, त्याने 66 धावांची खेळी केली. जोश हेजलवुडच्या गोलंदाजीवरच जोश इंग्लिसने रवींद्र जडेजाचा झेल घेतला. जडेजाने केवळ 9 धावा केल्या. हेजलवूडच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा इंग्लिसने झेल घेतला, सूर्याने 19 धावांची खेळी खेळली.
आता कर्णधार पॅट कमिन्सबद्दल बोलूया. आतापर्यंत विश्वचषकाच्या इतिहासात असे आठ वेळा घडले आहे की, गोलंदाजीच्या दहा षटकांत फलंदाजाने आपल्या चेंडूवर एकही चौकार मारला नाही. पण या आठ गोलंदाजांमध्ये फक्त पॅट कमिन्स हा वेगवान गोलंदाज आहे.
कर्णधार पॅट कमिन्सने आज अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने दहा षटकांत केवळ 34 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने पहिल्यांदा श्रेयस अय्यरला चार धावांवर बाद केले आणि नंतर विराट कोहलीला बोल्ड केले. कोहलीला केवळ 54 धावा करता आल्या.
अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून ऑस्ट्रेलियाला रोखता आले. आजच्या सामन्यात भारतीय संघाने जास्त षटकार मारले नाहीत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बॅटमधून फक्त तीन षटकार आले, तर इतर कोणत्याही फलंदाजाला षटकार मारण्यात यश आले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.