Gujarat Titans Captain: जर हार्दिक मुंबईत परतला, तर गुजरात कोणाला करणार कर्णधार? 'हे' आहेत 3 पर्याय

IPL 2024: जर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परत गेला, तर गुजरात टायटन्सच्या नेतृत्वासाठी कोणते तीन प्रमुख पर्याय आहेत, याचा घेतलेला आढावा.
Hardik Pandya & Shubman Gill
Hardik Pandya & Shubman GillDainik Gomantak

Gujarat Titans Captaincy Options:

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाच्या दृष्टीने संघबांघणीच्या हालचालींना गेल्या काही दिवसात वेग आल्याचे दिसत आहे. नुकतेच शनिवारी भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या ट्रेडिंगच्या चर्चांना उधाण आले होते.

असे म्हटले जात आहे की गुजरात टायटन्स त्यांचा कर्णधार असलेल्या पंड्याला मुंबई इंडियन्सबरोबर ट्रेड करणार आहे. त्यामुळे हार्दिक दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतो.

मात्र, जर हे ट्रेडिंग यशस्वी झाले, तर गुजरातला आयपीएल 2024 हंगामासाठी नवा कर्णधार नेमावा लागणार आहे. अशात हार्दिकनंतर गुजरातकडे कर्णधारपदासाठी कोणते तीन प्रमुख पर्याय आहेत, याचा आढावा घेऊ.

1. केन विलियम्सन -

न्यूझीलंड क्रिकेटचा दिग्गज क्रिकेटपटू केन विलियम्सनला गेल्यावर्षी गुजरातने संघात घेतले होते. पण तो पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने पूर्ण हंगामातून बाहेर झाला होता. मात्र आता तो पूर्ण तंदुरुस्त असून नुकताच वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही खेळला आहे.

विलियम्सनला आयपीएलचा चांगला अनुभव देखील आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्वही केले असून त्याच्या नेतृत्वाखाली 2017 साली संघ अंतिम सामन्यातही पोहचला होता. इतकेच नाही, तर गेली अनेकवर्षे विलियम्सन न्यूझीलंडचे नेतृत्वही करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली विलियम्सनने कसोटी चॅम्पियनशीप जिंकली आहे.

विलियम्सनने आयपीएलमध्ये 77 सामने खेळले असून 36.22 च्या सरासरीने 2101 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 18 अर्धशतके केली आहेत.

2. राशिद खान -

करामती खान म्हणून ओळखला जाणारा राशिद खान हा देखील गुजरातचे नेतृत्व करण्यासाठी चांगला पर्याय आहे. राशिदलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबर आयपीएलचाही चांगला अनुभव आहे.

गुजरातने 2022 मध्ये राशिदला 15 कोटींमध्ये संघात घेतले होते. राशिदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याला अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे.

राशिदने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 109 सामने खेळले असून 20.76 च्या सरासरीने 139 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 1 अर्धशतकासह 443 धावा केल्या आहेत.

3. शुभमन गिल -

भारताचा प्रतिभाशाली फलंदाज शुभमन गिल हा देखील गुजरातचे नेतृत्व करण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याच्याकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जातात. त्यामुळे भविष्याचा विचार करता दीर्घकाळासाठी गिलकडे कर्णधार म्हणून पाहिजे जाऊ शकते.

शुभमनने गिल 2018 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत 91 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतकांसह 2790 धावा केल्या आहेत. त्याने ही तीनही शतके 2023 आयपीएल हंगामात केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com