Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalDainik Gomantak

ICC Rankings: जयस्वाल भारीच! आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वीची गगनभरारी

Yashasvi Jaiswal: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यातच आता, आयसीसी कसोटी क्रमवारीतही त्याची कामगिरी दिसून आली आहे.

ICC Rankings: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यातच आता, आयसीसी कसोटी क्रमवारीतही त्याची कामगिरी दिसून आली आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने 14 अंकाची जबरदस्त झेप घेतली आहे. तो आता आयसीसी कसोटी क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

यशस्वी जयस्वालने सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध दोन द्विशतके झळकावली. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर यशस्वीने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही द्विशतक झळकावले. त्याचा फायदा त्याला कसोटी क्रमवारीतही झाला आहे. दरम्यान, जर तो असाच फॉर्ममध्ये राहिला तर तो लवकरच टॉप 10 मध्ये स्थान मिळवू शकतो.

Yashasvi Jaiswal
ICC ODI Rankings मध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला फायदा; बाबर आझम अव्वल स्थानी कायम!

दरम्यान, राजकोट कसोटी सामन्यानंतर यशस्वी जयस्वालच नाही तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही एका अंकाचा फायदा झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो 13व्या क्रमांकावर होता, पण त्याने राजकोटमध्ये शतक झळकावले आणि तो 12 व्या स्थानी पोहोचला. भारताचे आता टॉप 15 मध्ये चार फलंदाज आहेत.

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली (Virat Kohli) सातव्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा 12 व्या स्थानावर, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 14 व्या आणि यशस्वी जयस्वाल 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. यशस्वी जयस्वाल मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर तो टॉप 10 मध्येही पोहोचू शकतो.

Yashasvi Jaiswal
ICC T20I Ranking: शिवम दुबेने रोहित, गिललाही टाकले मागे, तर जयस्वाल - अक्षर टॉप-10 मध्ये

दुसरीकडे, न्यूझीलंडचा माज कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात 893 गुण आहेत, तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 818 गुण आहेत.

त्याचबरोबर, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सतत खराब शॉट्स खेळून बाद होत असलेल्या जो रुटला दोन अंकांचा फटका बसला आहे. आतापर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता त्याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com