ऑस्ट्रेलिया क्रिकेट (Australia cricket team) संघातील प्रमुख नावे ज्यांना वेस्ट इंडीज (West Indies) आणि बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यावर वगळले होते त्यांची येत्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी (ICC T20 World Cup) निवड झाली आहे. २ दिवसापूर्वी आय सी सी (ICC) ने टी-20 विश्वचषकचे वेळापत्रक जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया खराब फॉर्म मध्ये आहे. त्यांना बांगलादेशकडून टी-20 सामन्यांमध्ये देखील ४-१ नी पराभव स्वीकारावा लागला होता.
बांगलादेश विरुद्ध मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात काही बदल करणार का याची चर्चा होती. गुरुवारी त्यांनी टी-20 विश्वचषकसाठी संघाची निवड केली. आरोन फिंच संघाचे नेतृत्व करेल तर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या सारख्या दिग्गज खेळाडूंचं देखील संघात पुनरागमन होताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज झेय रिचर्डसन, अँड्र्यू टाय आणि जेसन बेहरनडोर्फ यांच्यासह टॉप-ऑर्डर फलंदाज अॅलेक्स केरी, मोईसेस हेन्रिक्स, जोश फिलिप आणि एश्टन टर्नर यांना मात्र संघात स्थान देण्यात आलं नाही.
“आम्हाला खात्री आहे की या संघात अत्यंत स्पर्धात्मक स्पर्धा कशी असेल याची सखोल बाजू घेण्याची क्षमता आहे. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी काही त्यांच्या सामूहिक अनुभवांसह जगातील सर्वोत्तम टी -20 संघाविरुद्ध यशस्वी होण्यासाठी आहेत," असं मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी व्यक्त केले.
ऑस्ट्रेलिया ग्रुप 1 मध्ये असून त्यांचा सामना वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांबरोबर होईल.
फेरी 1 (पात्रता टप्पा):
गट अ: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामिबिया
गट ब: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान
सुपर 12s (अंतिम फेरी):
गट 1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए 1, बी 2
गट 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बी 1, ए 2
ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वचषकसाठी निवड झालेला संघ
आरोन फिंच (कर्णधार ), अॅश्टन अगर, पॅट कमिन्स (उप-कर्णधार), जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा .
आरक्षित: डॅन ख्रिश्चन, नॅथन एलिस, डॅनियल सॅम
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.