इंडियन प्रिमिअर लीगचा (Indian Premier League) चौदावा हंगाम अखेरच्या टप्प्यामध्ये आला आहे. या अखेरच्या टप्प्यामध्ये प्लेऑफसाठी चुरस लागली आहे. परंतु जस-जसा आयपीएलचा प्रवास अखेरच्या टप्प्याकडे सुरु झाला असताना क्रिकेटप्रेमींमध्ये टी-ट्वेन्टी वर्ल्डकपची (ICC T20 World Cup) उत्सुकता वाढू लागली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघांच्या नेतृत्वाकडे लक्ष लागले आहे. मात्र क्रिकेट प्रेमींकडे आणखी एका गोष्टीची उत्सुकता लागली आहे ती म्हणजे, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया (Team India) कोणता जर्सी परिधान करणार.
दरम्यान, इंडियन क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या सोशल मिडियावरील ट्वीटर हॅंडलवरुन एक घोषणा केली आहे. येत्या 13 ऑक्टोबरला भारतीय संघाची नवी जर्सी लॉन्च होणार असल्याने विराट आर्मी आता टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी (T20 World Cup 2021) नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. टीम इंडिया सध्या वनडे सामन्यासाठी नेव्ही ब्लू रंगाची जर्सी घालून खेळत आहे. 2020 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या जर्सीमध्ये दिसत आहे. क्रिकेटप्रेमींनीही या जर्सीला चांगलीच पसंती दिली आहे. मात्र आता काही दिवसामध्येच हे अधिकारिकरित्या स्पष्ट होईल की, नव्या जर्सीमध्ये नेमका काय बदल केलेला असेल ते.
शिवाय, टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेला येत्या 14 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा 24 तारखेला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानशी (Pakistan) दुबईतील अंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) रंगणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.