ICC ODI Rankings: 'या' सुपरस्टार खेळाडूची गाडी सुसाट, रोहित-विराटला टाकले मागे

ICC ODI Rankings: सध्याच्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात अनुभवी फलंदाज आहेत.
Rohit Sharma & Virat Kohli
Rohit Sharma & Virat Kohli Dainik Gomantak

ICC ODI Rankings: सध्याच्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात अनुभवी फलंदाज आहेत. रोहित कर्णधारपद सांभाळत आहे तर विराट त्याच्या बॅटने गोलंदाजांची पळताभुई थोडी करत आहे. दरम्यान, भारताच्या एका खेळाडूने या दोन्ही दिग्गजांना आयसीसी क्रमवारीत मागे टाकले आहे.

रोहितला फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्थान मिळवले आहे. तो आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने 10 स्थानांची सुधारणा केली आहे. तो आता 76 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Rohit Sharma & Virat Kohli
ICC ODI Ranking: किंग कोहली पुन्हा टॉप 5 फलंदाजांमध्ये, गिल-सिराजचीही गरुडझेप

हा खेळाडू भारताचा सर्वोत्तम ठरला

फलंदाजांच्या यादीत एक खेळाडू पुढे गेला आहे. तो दुसरा कोणी नसून युवा सलामीवीर शुभमन गिल आहे. पंजाबचा शुभमन गिल (Shubman Gill) हा भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून पाचव्या क्रमांकावर आहे. अनुभवी विराट कोहली 7व्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे.

सिराज तिसऱ्या क्रमांकावर आहे

गोलंदाजांच्या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तिसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत तो एकमेव भारतीय आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड अव्वल स्थानावर आहे.

Rohit Sharma & Virat Kohli
ICC ODI Rankings: बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या ईशानची ICC क्रमवारीत गगनभरारी!

तसेच, ऑस्ट्रेलियाचा लेग-स्पिनर अॅडम झाम्पा भारताविरुद्ध चेन्नई वनडेमध्ये 4 विकेट घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मालिकावीर ठरलेला मिचेल मार्श फलंदाजांच्या यादीत 4 स्थानांनी प्रगती करत 51व्या स्थानावर पोहोचला आहे.

त्याचबरोबर, टी-20 मालिकेत पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करताना शानदार गोलंदाजी करणारा फिरकीपटू राशिद खान या फॉरमॅटचा अव्वल गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाला मागे टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com