World Cup 2023: स्पर्धेपूर्वीच वर्ल्डकप ट्रॉफीच्या जग भ्रमंतीला स्पेसमधून सुरुवात; या दिवशी पोहचणार भारतात

वर्ल्डकप 2023 ट्रॉफी जगभरातील 18 देशांचा प्रवास करणार आहे.
World Cup 2023
World Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

ICC Men's Cricket World Cup Trophy Tour 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (27 जून) वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असून 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनोख्या प्रकारे अनावरण करण्यात आले आहे. या ट्रॉफीने 120,000 फुट उंचीवर अंतराळात अनावरण करण्यात आले आहे. त्यानंतर ही ट्रॉफी भारतातील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहचली. या अनावरणाचा व्हिडिओही आयसीसीने शेअर केला आहे.

एका विशिष्ट फुग्याला ट्रॉफी जोडण्यात आल्यानंतर फोर के कॅमेऱ्याने अंतराळात ट्रॉफी पृथ्वीच्या वातावरणाच्या किनाऱ्यावर असल्याचे फोटो काढण्यात आले. यानंतर आता या वर्ल्डकप ट्रॉफीचा जगभर भौतिक प्रवास सुरु होईल.

World Cup 2023
World Cup 2023 India: वेळापत्रक घोषित! 'या' दिवशी होणार श्रीगणेशा, 46 दिवस रंगणार थरार

ही ट्रॉफी 27 जूनपासून जगभरातील 18 देशांचा प्रवास करणार आहे. यामध्ये यजमान भारतासह कुवेत, बहारेन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा काही देशांचा समावेश आहे. या प्रवासादरम्यान जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेतील काही आठवणींना उजाळा देता येणार आहे.

असा होणार ट्रॉफीचा प्रवास

  • 27 जून ते 14 जुलै: भारत

  • 15-16 जुलै: न्यूझीलंड

  • 17-18 जुलै: ऑस्ट्रेलिया

  • 19-21 जुलै: पापुआ न्यू गिनी

  • 22-24जुलै: भारत

  • 25-27 जुलै: अमेरिका

  • 28-30 जुलै: वेस्ट इंडिज

  • 31 जुलै - 4 ऑगस्ट: पाकिस्तान

  • 5-6 ऑगस्ट: श्रीलंका

  • 7-9 ऑगस्ट: बांगलादेश

  • 10-11ऑगस्ट: कुवेत

  • 12-13 ऑगस्ट: बहारीन

  • 14-15 ऑगस्ट: भारत

  • 16-18 ऑगस्ट: इटली

  • 19-20 ऑगस्ट: फ्रान्स

  • 21-24ऑगस्ट: इंग्लंड

  • 25-26 ऑगस्ट: मलेशिया

  • 27-28ऑगस्ट: युगांडा

  • 29-30 ऑगस्ट: नायजेरिया

  • 31 ऑगस्ट - 3 सप्टेंबर: दक्षिण आफ्रिका

  • 4 सप्टेंबरपासून भारतात

World Cup 2023
World Cup Qualifiers 2023: सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग अन् बॉलिंगमध्येही नेदरलँड्सच्या वॅन बिकचाच जलवा! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

वर्ल्डकप 2023 स्पर्धा रंगणार 48 दिवस

दरम्यान 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

एकूण 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने एकूण 10 शहरांमध्ये होणार आहेत. यातील 9 शहरांमध्ये भारताचे 9 साखळी सामने होणार आहेत.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. 

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com