T20 World Cup विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल; ICC ने केले जाहीर

T20 World Cup 2022 Prize Money: क्रिकेटचा महाकुंभ T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवला जाणार आहे.
Team Captain
Team CaptainDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2022 Prize Money: क्रिकेटचा महाकुंभ T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. यासाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. यातच आता आयसीसीने टी-20 विश्वचषकासाठी प्राइज मनी जाहीर केले आहे. T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला करोडो रुपये दिले जातील.

आयसीसीने जाहीर केले

आयसीसीने (ICC) जाहीर केले की, टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) 2022 ची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 कोटी 4 लाख भारतीय रुपये बक्षीस दिले जातील. त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला $800,000 (सुमारे 6 कोटी रुपये) मिळतील.

Team Captain
T20 World Cup: या राखीव खेळाडूला मिळणार Team India मध्ये स्थान!

उपांत्य फेरीत पोहोचणारे संघ श्रीमंत असतील

उपांत्य फेरीत पोहोचणारे संघही करोडपती बनेल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना 4-4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले जातील. तसेच, सुपर-12 मधील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील. त्याचबरोबर सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या संघांना 70-70 हजार अमेरिकन डॉलर्स दिले जातील.

Team Captain
T20 World Cup साठी भारतीय संघात होऊ शकतो बदल, या खेळाडूला मिळणार एन्ट्री !

16 संघ सहभागी होत आहेत

यावेळी 16 संघ T20 विश्वचषक 2022 मध्ये सहभागी होत आहेत. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान क्वालिफायर सामने खेळवले जातील. नामिबिया, नेदरलँड्स, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे हे संघ पात्रता फेरीत भाग घेतील. त्याच वेळी, मुख्य सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होतील. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत (India), न्यूझीलंड, पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका टॉप-8 मध्ये आहेत. भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com