बुमराहची स्पर्धा द. आफ्रिका अन् न्यूझीलंड खेळाडूंशी! ICC कडून ऑक्टोबरच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर

Player of the Month: आयसीसीने ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahX/BCCI
Published on
Updated on

ICC announced Player of the Month nominees for October 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार दिला जातो. यासाठी आधी त्या महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन-तीन खेळाडूंना नामांकन दिले जाते.

त्यानुसार आयसीसीने ऑक्टोबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकित केलेल्या खेळाडूंमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.

आयसीसीने नामांकन दिलेल्या पुरुष खेळाडूंमध्ये बुमराहसह दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्रचा समावेश आहे. या तिघांनीही ऑक्टोबर महिन्यात भारतात सुरु असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे.

Jasprit Bumrah
Best Fielder Video: रोहित, जड्डू, सूर्या की केएल? रोबोट कॅमेरानं निवडला द.आफ्रिकेविरुद्ध 'बेस्ट फिल्डर'

बुमराहने ऑक्टोबर महिन्यात वर्ल्डकप 2023 मध्ये खेळताना भारतासाठी 14 विकेट्स घेतल्या. त्याने भारताने ऑक्टोबर महिन्यात मिळवलेल्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने केवळ 3.91 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 39 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तसेच इंग्लंडविरुद्ध 16 धावा करण्याबरोबरच 32 धावांत 3 विकेट्स घेतल्या.

त्याचबरोबर बुमराहबरोबर नामांकन मिळालेल्या क्विंटन डी कॉकने ऑक्टोबर महिन्यात तीन शतकांसह 431 धावा केल्या. त्याने मुंबईत बांगलादेशविरुद्ध 174 धावांची खेळी केली. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना एक यष्टीचीत आणि 10 झेलही घेतले.

Jasprit Bumrah
World Cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशशी हस्तांदोलन करण्यास नकार! मॅथ्यूजनं सांगितलं, 'कारण त्यांनी आम्हाला...'

याशिवाय ऑक्टोबरमध्ये रचिन रविंद्रनेही प्रभावित करणारी कामगिरी केली. त्याने ऑक्टोबरमध्ये 2 शतकांसह 81.20 च्या सरासरीने 406 धावा केल्या. त्याने इंग्लंडविरुद्ध 123 धावांची आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 116 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने 3 विकेट्सही घेतल्या.

महिलांमध्ये या खेळाडूंना मिळाले नामांकन

ऑक्टोबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्युज, बांगलादेशची नाहीदा अख्तर आणि न्यूझीलंडच्या एमेलिया केरला नामांकन मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com